रोजगार हमी योजनांच्या कामाचा लाभ घेण्याचे आटपाडीच्या सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांचे आवाहन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, September 8, 2019

रोजगार हमी योजनांच्या कामाचा लाभ घेण्याचे आटपाडीच्या सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांचे आवाहन


माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : आटपाडी ग्रामपंचायत अंतर्गत वैयक्तिक रोजगार हमी योजनांच्या कामाचा लाभ घेण्याचे आवाहन आटपाडी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांनी केले आहे. यामध्ये वैयक्तिक नवीन विहीर पाडणे, जुन्या विहिरीचा गाळ काढणे, शेततळे काढणे, नवीन फळबाग लागवड करणे या कामांचा समावेश आहे. या संदर्भात तसेच इतर विविध योजना अंतर्गत लाभार्थी निवडणे व त्यांचे प्रस्ताव पुढील शासकीय कार्यालयाकडे त्वरित पाठवणेचे  आहे.
तरी गरजु लाभार्थींनी ग्रामपंचायत आटपाडीकडे त्वरित संपर्क करून तशाप्रकारे ग्रामपंचायतचा ठराव व लागणारी कागदपत्रे ग्रामपंचायत मधून घेवून जावे असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच सदरची कामे हि वैयक्तिक असल्याने सदर कामाचा स्वतः पाठपुरावा करावा लागणार आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise