माळशिरसच्या श्रीनाथ विद्यालयाचे शालेय क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, September 23, 2019

माळशिरसच्या श्रीनाथ विद्यालयाचे शालेय क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश


माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे : मा. श्री. आप्पासाहेब देशमुख सामाजिक बहुउद्देशीय संस्था माळशिरस, संचलित श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज, माळशिरसच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे रोवले गेले. जिल्हा परिषद क्रीडा सोलापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या अनेक क्रीडा स्पर्धेत श्रीनाथ विद्यालयाचे विद्यार्थी अजिंक्य ठरले. यामध्ये प्रामुख्याने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत चि.पृथ्वीराज देशमुख व चि. रविराज रुपनवर प्रथम, चि.शिवाजी हुलगे द्वितीय, तालुकास्तरीय पाच कि.मी.चालणे चि. अजिंक्य ठवरे प्रथम, समाधान वाघमोडे द्वितीय, तालुकास्तरीय योगासने मध्ये चि.सागर मोटे प्रथम, तालुकास्तरीय कराटेत चि.तेजस बुरुंगले प्रथम, २०० मी.धावणे चि.जगदीश तरंगे तृतीय, १०० मी.धावणे चि.संचित हांगे तृतीय, जिल्हास्तरीय शुटींगबॉल चि.अफरोज काझी प्रथम या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. त्यांना क्रीडाशिक्षक सचिन बोरावके यांचे मार्गदर्शन केले. 
संस्थेचे संचालक महेश बोत्रे, विजय देशमुख, सचिन वावरे, रावसाहेब देशमुख प्राचार्य योगेश गुजरे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होते..

No comments:

Post a Comment

Advertise