खा. डॉ.सुजय विखे-पाटील यांचा सोशल मिडियावर व्हिडीओ व्हायरल; नेटीझन्स कडून मोठ्या प्रमाणात ट्रोल ; म्हणाले होते 'मोदीसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज अन् डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचं झालं काय?' - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, September 23, 2019

खा. डॉ.सुजय विखे-पाटील यांचा सोशल मिडियावर व्हिडीओ व्हायरल; नेटीझन्स कडून मोठ्या प्रमाणात ट्रोल ; म्हणाले होते 'मोदीसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज अन् डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचं झालं काय?'


माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : भाजपचे विद्यमान खास. डॉ.सुजय विखे-पाटील यांचा 'मोदीसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज अन् डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचं झालं काय?' हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटीझन्स कडून मोठ्या प्रमाणात त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. डॉ.सुजय विखे ज्यावेळी कॉंग्रेसमध्ये होते त्यावेळी त्यांनी एका एका कार्यक्रमात बोलताना मोदीसाहेब छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच काय झाल? गुजरात मध्ये मात्र सरदार वल्लभभाई पटेल याचं स्मारक ३६ महिन्यात ३६०० कोटी रुपये खर्च करून स्मारक तयार झाल परंतु महारष्ट्रात मात्र छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचं स्मारक पूर्ण होवू शकले नाही असा प्रश्न त्यांनी त्यावेळी बोलताना भाजप सरकारला केला होता.

परंतु आता मात्र ते भाजपचेच खासदार असल्याने त्यांचा टो व्हीडीओ व्हायरल होत आजे. त्यामुळे त्यांनी सरकारला आता प्रश्न विचारून छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पूर्ण करून घ्यावे असे प्रश्न त्यांना नेटीझन्स कडून होत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise