Type Here to Get Search Results !

धरणी आईची माया कशी जाईल वाया .....म्हसवड परिसरात पावसाची दमदार हजेरी


म्हसवड परिसरात पावसाची दमदार हजेरी
माणदेश एक्सप्रेस न्यूज
 म्हसवड/अहमद मुल्ला : गत दहा वर्षांपासून माणतालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने येथील दुष्काळी जनता प्रचंड उराशी स्वप्न बाळगून असणाऱ्या माण मधील बळीराजाला सोमवार व मंगळवारच्या ढगांच्या गडगडाट विजांच्या कडकडाटासह मेघराजाने दमदार मुसळधार पाऊस पडल्याने दिलासा दिल्याने माणगंगा नदी दहा वर्षा नंतर दुथडी भरुन वाहू लागल्याने हे पाणी नदीपात्राबाहेर आल्याने हे पाहण्यासाठी एकच शहरवासियांनची बुधवारी सकाळी झुंबड उडाली होती. नदीला पाणी आलं रे आलं.... हे शब्द कित्येक वर्षातुन कानावर पडले. मंगळवारी रात्रभर मात्र हा मेघराजा धोधो बरसल्याने जनतेच्या चेहऱ्यावरील हास्य व आनंद गगणात मावत होता.

माणतालुक्यातील जनता दुष्काळी परिस्थितीमुळे गत नऊ महिन्यापासून जनावरे जगवण्यासाठी छावणीवर व घरी असलेले लोक ट्ँकरची वाट पाहण्यात दिवस ढकलीत जगत होती. गत अनेक वर्षात वरुणराजाची कृपादृष्टी माणवरची कमी कमी होत गेल्याने येथील जनता हवालदिल झाली होती. पण गत आठवड्यात दोन मोठे मुसळधार पाऊस व मंगळवारी रात्रभर पडलेल्या पावसाने दहा वर्षानंतर माणगंगा नदी दुथडी भरुन वाहू लागल्याने समाधान व्यक्त होत आहे. संपूर्ण माणतालुक्यात कमी अधिक स्वरुपाचा पाऊस झाला आहे. सोमवार पर्यत शिंगणापूर व कुकुडवाड मंडलात पाऊसाने पाठ फिरवली होती पण मंगळवारच्या पावसाने हजेरी लावल्याने ओढे नाले व पाणी फौडेशनच्या माध्यमातून केलेल्या जलसंधारणाचे कामे पूर्णपणे पाऊसाच्या पाण्याने तुडुंब भरले आहेत.
दुष्काळी माण तालुक्याला गेली दोन दिवस पावसाने झोडपूण काढले आहे. राञी अक्षरश आतिवृष्टी झाली आहे. गाडेवाडी तलाव शिंदी खुर्द, भांडवली, मलवडीचे सर्व बंधारे भरुन पाणी आंधळी धरणात मोठ्या प्रमाणात चालू आहे. कोरडे ठणठणीत असणारे धरण लवकरच पूर्णक्षमतेने भरणार असून माणगंगा दुथडी वाहणार आहे. वावरहिरे परीसरात सर्वच बंधारे भरले असून राणंद तलावात पाणी चालू आहे. पळशी पासून पुढे माणगंगा नदी दुथडी वहात असून म्हसवडला पाणी पात्रा बाहेर गेले आहे. दिवडलाही ओढे फुल वहात आहेत. झळके वस्तीवर फुलावरुन ५ फुट पाणी आहे. मलवडी खडकहिरा आंधळी व परकंदीवरुन येताना माणगंगा नदीवरील पूल पुन्हा पाण्याखाली गेले आहेत. सर्व माण तालुक्यात राञभर रेकार्डाब्रेक पाऊस झाला आहे.

म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा नजिकचा वडजाई ओढ्यावरील लांबमळा येथील माणदेशी बंधारा आज पहाटे पासून भरुन वाहू लागला आहे. सातारा-पंढरपूर रसत्यावरील वाहतूक पहाटे पासूनच ठप्प झाली होती. कही खुशी कही गम.... मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे म्हसवड शहरातील बसस्थानक परिसरातील बिल्डींगच्या तळघरातील अनेक दुकानगाळ्यात त्रिषा मेडिकल मध्ये पाणी गेल्या मुळे लाखा रुपयचे नुकसान झाले आहे. तसेच आणखी दुकानात सात-आठ फुट पावसाचे पाणी साठल्याने अनेक दुकानतील इल्केट्राँनिक्स, कापड व इतर साहित्यांचे मालांचे तसेच फ्लेक्स मशनिचे लाखो रुपयांचे साहित्याचे नुकसान झाले आहे. दसरा दिवाळी सणानिमित्त व्यापाऱ्यांनी दुकानात माल भरला होता. तो सर्व माल पाण्यात गेल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies