Type Here to Get Search Results !

'सांगोला महाविद्यालयात सरपंच, उपसरपंच यांचेसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षण संपन्न'


माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगोला : सांगोला महाविद्यालयामध्ये तालुक्यातील सरपंच, उपसरपंच यांचेसाठी शनिवार दि. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यशदा, पुणे व राज्यशास्त्र विभाग  आणि महाविद्यालयाचा अंतर्गत गुणवत्ता हमी सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात  तालुक्यातील एकूण ४२ सरपंच, उपसरपंच यांनी सहभाग नोंदविला. या प्रशिक्षणाचे उद्घाटन यशदा पुणे येथील राज्य ग्रामीण विकास संस्थेचे उपसंचालक, बी. एम. वराळे यांचे हस्ते झाले. तर अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष बाबुरावजी गायकवाड हे होते. त्यांनी लोकाभिमुख लोक विकासाचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस उजाळा देवून आपल्या स्वअनुभवनावून, ग्रामपंचायतीचे कामकाज कसे आदर्शवत लोकाभिमुख  करावे याबाबत मार्गदर्शन केले.
व्यासपीठावरून संस्थेचे उपाध्यक्ष तात्यासाहेब केदार बोलताना म्हणाले की,  ग्रामसभा म्हणजे गावची मिनी लोकसभा होय, यामध्ये सरपंचांनी आपल्या अधिकारांचा वापर करून गावचा सर्वांगीण विकास साधावा. यावेळी संस्था सचिव म.सि. झिरपे सर व इतर संस्था पदाधिकारी उपस्थित होते. बी.एम. वराळे यांनी सरपंच, उपसरपंच यांची कार्ये, अधिकार व सामाजिक बांधिलकी विषयी मार्गदर्शन केले. आमचं गाव आमचा विकास तसेच त्यांनी सरकारच्या विविध ग्रामविकास योजनांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी तालुक्यामध्ये पंचायत समितीने केलेल्या उल्लेखनीय कार्याचा परिचय करून दिला. यशदाच्या जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंदा पुसावळे यांनी   जल पुनर्भरण, पाणी साठविणे या विषयी समाजामध्ये जाणीवजागृती करुन दुष्काळी भागामध्ये जलसाक्षरता होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी विविध सरपंच, उपसरपंच यांनी आपले अनुभव प्रकट केले. हे प्रशिक्षण भविष्यात  उपयुक्त ठरणार आहे, असे मत व्यक्त केले. समारोप सत्राच्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.पी.सी. झपके यांनी आपल्या राजकीय व सामाजिक जीवनातील अनुभवाच्या आधारे हे प्रशिक्षण सरपंचाना कशाप्रकारे उपयुक्त आहे हे सांगितले.  
या प्रशिक्षणाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुसूदन बचुटे, अंतर्गत गुणवत्ता हमी सेलचे प्रमुख डॉ. टी. आर. माने यांच्या मार्गदर्शनामध्ये पार पडले. प्रा. जे. व्ही. माने (राज्यशास्त्र विभाग) यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा. लेप्टनंट संतोष कांबळे यांनी केले. पी.एस. शिंदे,  डॉ नितिन बाबर, प्रा. डॉ.जे.एम. तांबोळी तसेच प्रशिक्षण आयोजनांसंबंधित महाविद्यालयातील विविध समिती प्रमुख व सदस्य यांनी प्रशिक्षण यशस्वी पार पाडण्यासाठी श्रम घेतले. त्याचबरोबर इतर सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies