Type Here to Get Search Results !

अवैध धाबे व खानावळीवर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत कारवाई


माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : विधानसभा निवडणूक -2019 आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क, सांगली विभागामार्फत करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सांगली शहर व परिसरातील अवैध धाबे व खानावळी यांच्यावर दिनांक 23 सप्टेंबर 2019 रोजी कारवाई करण्यात आली. यामध्ये हॉटेल सत्यम ढाबा, धामणी रोड सांगली, भिलावे खानावळ, कत्तलखाना जवळ, सांगली या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी छापा टाकून तेथे मद्यपान करताना आढळून आलेल्या 14 लोकांना ताब्यात घेण्यात आले. तसेच दोन्ही हॉटेलचे मालक यांना ताब्यात घेण्यात आले. सर्वांची वैद्यकीय तपासणी करून रक्ताचे नमुने घेऊन पृथकरणसाठी न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क सांगली कार्यालयातर्फे देण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे fl 3 परमिट रूम बियर बार वगळता इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे हा मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा आहे तसेच धाबे व खानावळी मालकांनी देखील मद्य पिण्यास जागा उपलब्ध करून दिल्यास त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात येतील, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे करण्यात आले आहे. 
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क सांगलीच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक विश्वजित देशमुख, श्री.शेतसंधी, श्री. वाडेकर, श्री.घाटगे, श्री. तडळवळकर, सर्व दुय्यम निरीक्षक व इतर जवान संवर्गीय कर्मचारी यांच्या पथकाने केली. या प्रकारच्या कारवाया अशाच प्रकारे सुरूच राहतील असे राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies