पडळकरांनी विधानसभा खानापूर मतदार संघातून लढवविण्याची कार्यकर्त्यांची मागणी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, September 11, 2019

पडळकरांनी विधानसभा खानापूर मतदार संघातून लढवविण्याची कार्यकर्त्यांची मागणी


माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/धिरज प्रक्षाळे :  वंचित आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी  विधानसभा निवडणूक ही खानापूर मतदार संघातूनच लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांणी केली आहे. गोपीचंद पडळकर आगामी विधानसभा जत किंवा सांगोला अशा अनेक मतदार संघातून लढवण्याच्या अनेक बातम्या सध्या सोशल मिडियावर तसेच अनेक वृत्तपत्रातुन सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांचा घरचा मतदारसंघ असणाऱ्या खानापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आता गोपीचंद पडळकर यांनी खानापूर आटपाडीतुनच निवडणुक लढवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख निर्माण करणारे नेते म्हणून पडळकर यांचे नाव घेतले जाते व असाच नेता खानापूर आटपाडी तालुक्यातील उपेक्षित वंचित लोकांना न्याय देऊ शकतो अशी गावगाड्यातील शेवटच्या माणसाची चर्चा आहे व गोपीचंद पडळकर आमदार व्हावे याकरता या तालुक्यामध्ये ज्या-ज्या काही राजकीय घडामोडी कराव्या लागतील त्या-त्या करू असे प्रतिपादन खानापूर तालुक्याचे युवानेते संग्रामनाना माने म्हणाले. यावेळी आळसंद गावचे उपसरपंच सरपंच विक्रमभैय्या पाटील, मंथननाना मेटकरी, प्रशांत माने, गार्डी गावचे ज्येष्ठ नेते काका ऐवळे, खानापूर तालुका खादी ग्राम उद्योगचे चेअरमन सचिन गायकवाड, विक्रमभैय्या भिंगारदिवे, सुजित पवार, उदय नलवडे, जहीर मुलाणी, महादेव साठे, रघु मेटकरी, चंद्रकांत रणपिसे, तुषार ठोंबरे, बंडू वाघमोडे, महेश मानेंसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise