Type Here to Get Search Results !

माळशिरस येथे उद्या महाआघाडीचा कार्यकर्ता मेळावा : अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती

माळशिरस येथे उद्या महाआघाडीचा कार्यकर्ता मेळावा
अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती
 माणदेश एक्सप्रेस न्यूज
माळशिरस/प्रतिनिधी : माढा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या प्रचारार्थ माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि. ५ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता माळशिरसमधील अक्षता मंगल कार्यालय  येथे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती तालुका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्यावतीने  देण्यात आली.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, आ. बबनदादा शिंदे,विधान परिषद आमदार ॲड. रामहरी रुपनवर,सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील, माढा पं.स. सभापती रणजीतसिंह शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य श्रीलेखा पाटील,माजी जि.प अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील, हिंदूराव माने-पाटील, बाळूअण्णा पाटील,गटनेते शंकरराव देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंगभाऊ देशमुख,उपनगराध्यक्ष डॉ. मारुती पाटील,माजी जि.प.सदस्य डॉ.रामदास देशमुख, जयंत बगाड़े, सुरेश पालवे, सत्यशील पाटील,भानुदास पाटील, जयवंत पालवे, युवानेते सुजय माने-पाटील,काँग्रेस तालुकाध्यक्ष शिरीष फडे,नागेश काकड़े, राजकुमार हिवरकर,सोमनाथ पिसे, बापू भांड,राजाभाऊ रूपनवर तसेच तालुक्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून, सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
फोटो- आयडी- ४ अजितपवार, संजयमामा शिंदे,प्रकाश पाटील,रामहरी रुपनवर यांचे फोटो टाकणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies