श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालयातील माजी विद्यार्थ्याचा मेळावा उत्साहात संपन्न - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, April 5, 2019

श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालयातील माजी विद्यार्थ्याचा मेळावा उत्साहात संपन्न

श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालयातील माजी विद्यार्थ्याचा मेळावा उत्साहात संपन्न
माणदेश एक्सप्रेस न्युज
मांडवे/दत्ता ढोबळे: श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालयातील १० वी उतीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा तब्बल २५वर्षानंतर पुणे येथील सिंहगड रोडवरील वाईल्डरनेट या हिल रेस्टाॅर्टवर साजरा करण्यात आला.  या संदर्भात अधिक माहिती म्हणजे "व्हाटस अॅप ग्रुपच्या" माध्यमातुन सर्वाना एकत्र आण्याची किमया पुणे येथील पोलीस उपनिनिरक्षक असलेल्या शिवाजी भोसले यांनी साधली. सदर कार्यक्रमाचे नियोजन पुणे येथुन शिवाजी भोसले, मांडवे गावातुन संतोष बंदुके आणि शिवाजी होळ यांनी केले. 


२५ वर्षानंतर एकत्र भेटल्यामुळे सर्वजन आनंदीत झाले आणि पुढील आयुष्यात एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होण्याचा संकल्प केला. यावेळी कृषी विभागातुन दादासाहेब झेंडे, सुभाष ढोबळे, दादा साळुंखे तसेच उद्योगपती नाना जगदाळे, मेजर संजय बागल, दशरथ दुधाळ सर, प्रगतशील बागायतदार अर्जुन दुधाळ, विठ्ठल दुधाळ, हनुमंत पालवे, धनाजी पालवे, तुकाराम गोफणे यांचेसह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. वर्गशिक्षक डी.एस.निगडे सर यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


No comments:

Post a Comment

Advertise