Type Here to Get Search Results !

सोलापूर येथे गॅस गळती होऊन संसारोपयोगी वस्तू व रोख रक्कम जळून खाक

गॅस गळती होऊन संसारोपयोगी वस्तू व रोख रक्कम जळून खाक
सोलापूर/प्रतिनिधी:  सोलापूर येथील कर्णिक नगर परिसरातील, गीता नगरात घरगुती गॅस सिलिंडरची गळती होऊ लागलेल्या आगीत संसारोपयोगी वस्तू आणि रोख रक्कम जळून खाक झालीय. कर्णिकनगर परिसरातील गिता नगरातील यल्लम्मा मंदिरासमोर वडनाल यांच्या घरात अचानक गॅस गळती होऊन आग लागली. टेक्स्टाईल मिलमध्ये काम करणारे अमरनाथ तर शहरातील हॉटेलात वेफर्सचा पुरवठा करणारे अंबादास हे आपल्या कुटुंबासह  गीता नगरात राहण्यास आहेत. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घरातील महिला स्वयंपाक करीत असताना, अचानकपणे गॅस टाकीतून गॅस गळती झाली. या गळतीचे रुपांतर आगीत होऊन आग भडकली. अचानक घडलेल्या प्रसंगाने वडनाल कुटुंबीय घाबरले व त्यानंतर कुटुंबियातील सदस्यांना काय करावे हे कळेना. विद्युत पुरवठा बंद करुन सदस्यांना घराबाहेर काढण्यात आले. तातडीने अग्निशामक दलाशी संपर्क साधून अग्निशामक पथक बोलावून आग आटोक्यात आणली. परतु या १५ मिनिटांत हि आग पसरत जाऊन घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्याने त्यामध्ये १५ तोळे सोन्याचे दागिने, २० तोळे चांदीचे  दागिने,  ३ लाख २५ हजारांची रोकड, एक लॅपटॉप, एलईडी टीव्ही, २ मोबाइल हँडसेट व तसेच उमा अंबादास वडनाल यांनी काम करून जमा केलेली ६० हजार रुपयांची रोकडही जळून खाक झाली. तसेच आजी नरसम्मा चक्रवर्ती यांच्या जवळची ३० हजार रुपयांची रोकड अशी एकूण ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम जळून खाक झाली. मात्र या झालेल्या घटणेट कोणत्याही प्रकारची जिवित हानी झालेली नाही. या ठिकाणी आमदार प्रणिती शिंदे यांनी भेट देऊन कुटुंबीयांची विचारपूस करून चर्चा केली.

‘साहेब,कपडे सुद्धा आगीत भस्मसात झाले. 
बुधवारी झालेल्या या गॅस गळतीच्या आगीमध्ये  घरातील महत्त्वाच्या वस्तू तर जळून खाक झालेत  मात्र घरात असलेल्या व रोज वापरण्यात येणारे  कपडेसुद्धा या आगीत जळाल्याने दुसऱ्याचे कपडे वापरण्यात आले व बुधवारी रात्रीपासून ते गुरुवारी संध्याकाळपर्यंत जेवण सुध्दा न केल्याचे असे वडनाल यांनी बोलताना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies