संजय पाटील, विशाल पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस निवडणूक खर्चात मोठी तफावत, 48 तासात खुलासा करण्याचे आदेश - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, April 17, 2019

संजय पाटील, विशाल पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस निवडणूक खर्चात मोठी तफावत, 48 तासात खुलासा करण्याचे आदेश


संजय पाटील, विशाल पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस
निवडणूक खर्चात मोठी तफावत, 48 तासात खुलासा करण्याचे आदेश
सांगली/वार्ताहर: सांगली लोकसभा भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील आणि स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांना निवडणूक विभागाची नोटीस काढण्यात आली असून निवडणुकीच्या खर्चात मोठी तफावत आढळून आली आहे.
सांगली लोकसभा मतदार संघामध्ये तिरंगी लढत होत असून वंचित बहुजन विकास आघाडी कडून गोपीचंद पडळकर, महा आघाडी कडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील तर भाजप कडून विद्यमान खासदार संजय पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक आता तिरंगी होत असल्याने चुरस पहावयास मिळत आहे.
अशातच आता निवडणूक खर्चात तफावत आढळल्याने 48 तासात खुलासा करण्याचे आदेश संबंधित उमेदवार यान देण्यात आले आहेत.
संजय पाटील यांच्या खर्चात तब्बल तेरा लाख तर विशाल पाटील यांच्या खर्चात साडे नऊ लाख रुपयांची निवडणूक खर्चात तफावत आढळल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी उमेदवारांना बजावली नोटीस बजावली आहे. त्यामुळे उमेदवार कसा खर्च केला हे दाखवून नोटीस ला उत्तर देणार हे पहावे लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Advertise