Type Here to Get Search Results !

बालआनंद मेळाव्यातून चिमुकल्यांना प्रेरणा, कृती आणि सामर्थ्य मिळते : सभापती रमेश पाटोळे

माणदेश एक्सप्रेस न्यूज
वरकुटे-मलवडी/प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळांमधुन विदयार्थ्यांच्या अंगी असणारी कलात्मक कौशल्ये वाढीस लागावी आणि त्यामधून व्यक्तीमत्व विकास घडवून आणण्यासाठी बालआनंद मेळाव्यातून शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी जे उपक्रम राबवले जातात. ते खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माण तालुका पंचायत समितीचे सभापती रमेश पाटोळे यांनी केले.
जिल्ह्यातील आणि दुष्काळी माण तालुक्यातील टोकाचे गाव असलेल्या कुरणेवाडी (ता.माण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या बालआनंद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रप्रमुख जगन्नाथ विरकर,पंचायत समिती सदस्या चंद्राबाई आटपाडकर,पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, सरपंच उमेश आटपाडकर,अंकुश गाढवे, बनगरवाडीच्या सरपंच रंजना बनगर,विजयकुमार जगताप, कुबेर आटपाडकर,ईश्वर आटपाडकर, क्रिडा समन्वयक चंद्रकांत जाधव,शिक्षक समिती सरचिटणीस विजय बनसोडे,आर.बी.खाडे,पोपट जाधव आणि केंद्रातील मुख्याध्यापक शिक्षक,शिक्षिका आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्या जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई देसाई म्हणाल्या की,  लहान वयातच मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा,त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा आणि त्यांना अभिनय संपन्न कलाकृतींची निर्मिती करता यावी. तसेच यामधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाला चालना मिळावी. याकरिता प्राथमिक शाळेत मुलांच्या हक्काचे असणारे व्यासपीठ म्हणजेच बालआनंद मेळावा होय.
वरकुटे-मलवडी केंद्राचे केंद्रप्रमुख जगन्नाथ विरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुरणेवाडी येथील प्राथमिक शाळेत बालआनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुलांनी देशभक्तीपर गिते,अदिवासी नृत्य, भल्लरी,एकांकिका, पाणी अडवा पाणी जिरवा यावर आधारित गिते सादर केली. सुवर्णाताई देसाई,चंद्राबाई आटपाडकर, रंजना बनगर, संगिता गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले.
यावेळी केंद्रप्रमुख जगन्नाथ विरकर यांना शिक्षकरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल, जिल्हा आदर्श शिक्षक शिवाजी शिंगाडे, गणेश खंदारे यांना विशेष सत्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांना सरपंच उमेश आटपाडकर यांच्यातर्फे मिष्टान्न भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचालन शिवाजी शिंगाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्पना गायकवाड, वाघमोडे सर यांनी कष्ट घेतले. शेवटी आभार मुख्याध्यापक संजय गोरड यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies