दादांचं “घड्याळ” मामांच्या हाती व मामांचं “कमळ” दादांच्या हाती - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, March 24, 2019

दादांचं “घड्याळ” मामांच्या हाती व मामांचं “कमळ” दादांच्या हाती


दादांचं “घड्याळ” मामांच्या हाती व मामांचं “कमळ” दादांच्या हाती
नातेपुते/प्रमोद शिंदे: लोकसभा माढा मतदारसंघात नेत्यांच्या पक्षबदल प्रवेशाने चांगलीच खळबळ उडाली आहे. कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण होत असून होत असून पक्षनिष्ठा की, व्यक्तिनिष्ठा राखायची यावर आडून बसल्याचे चित्र दिसत आहे. सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांनी खेळी केल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला असे वाटत होते की, राष्ट्रवादीची उमेदवारीची  माळ ही पुन्हा  विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गळ्यात पडणार असल्याचे चित्र समोर दिसत होतं. परंतु मध्येच माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची इंट्री झाली व त्यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांची जवळीकता साधली. जवळीक साधून माढा मतदारसंघात यातील संधी साधण्याचा प्रयत्न केला. परंतु या मुळे माढा मतदारसंघात खळबळ उडाली. यातच दिपकआबा साळुंखे यांना ही मोह सुटला. तसेच बबनदादाही वाटले उमेदवारी आपल्यालाच मिळावी. त्याचप्रमाणे संजयमामा शिंदे यांचे ही लक्ष माढा मतदार संघाकडे असल्याचं दिसून येत होतं. यात माढा मतदारसंघात मोहिते-पाटलांचे पूर्वीपासूनच वर्चस्व असल्याचे दिसून येत होतं. परंतु या ढवळलेल्या वातावरणात मोहिते पाटलांना राष्ट्रवादीकडूनच अंतर्गत विरोध होत असल्याचं स्पष्ट झालं. या वातावरणाचा फायदा घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांनी माढ्यातुन स्वतःचीच उमेदवारी जाहीर केली. परंतु मोहिते-पाटलांची नाराजी पाहता पवार साहेबांनी यातून घुमजाव केला व माढ्यातून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेत पुन्हा मोहिते पाटील यांनाच उमेदवारी देण्याच्या चर्चा केल्या. परंतु अंतर्गत असलेला विरोध, कुरघोड्या मोहिते पाटलांना शेवटपर्यंत खेळवत ठेवण्याचं षड्यंत्र मोहिते-पाटील यांना समजले. यातच  मोहिते-पाटील यांनी वेगळा विचार करण्यास सुरुवात केली व जाहीर भाजप प्रवेश केला. या प्रवेशांमध्ये सध्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला आहे. परंतु खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी अद्यापही भाजपमध्ये प्रवेश केला नाही. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने मोहिते पाटील समर्थकात  नवचैतन्य निर्माण झाल्याचं चित्र समोर दिसून आले आहे. कार्यकर्ते संभ्रमात होते. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. अनेक दिवसापासून रखडलेली नीरा स्थिरीकरण योजनेला गती यावी व पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचं रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मत व्यक्त केलं. जरी मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी भाजपने अद्यापही उमेदवारी जाहीर केली नसल्याने मोहिते पाटील गटातील वातावरण शांतच असल्याचं दिसून येत आहे व रणजितसिंह मोहिते पाटील यांनाच उमेदवारी मिळावी अशा प्रकारचे मागणी कार्यकर्त्यांतून होत आहे. जरी असले तरी  पूर्वी  भाजपमधील  मोहिते-पाटील विरोधी गटातील नेते  मोहिते-पाटलांच्या  भाजप प्रवेशाबाबत  नाराज  असल्याचेही  चित्र काही ठिकाणी दिसत आहे. काही नेत्यांना चिंता वाटत आहे की, मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे तर जिल्ह्यातील  व माळशिरस तालुक्यातील भाजपची सर्व सूत्रे ते स्वतःकडेच ठेवतील अशी भीती भाजपच्या पूर्वीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाले असून तो गट भाजपा वरती नाराज होत असल्याचंही चित्र समोर येत असताना दिसत आहे. तसेच भाजपमधून सोलापूरचे भाजपचे सहकार मंत्री सुभाषबापू देशमुख यांच्या मुलाची माढा उमेदवारासाठी चर्चा सुरू असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Advertise