Type Here to Get Search Results !

औरंगाबादचे काँग्रेसचे नाराज नेते आमदार अब्दुल सत्तार यांनी घेतली मुख्यमंत्री यांची भेट


औरंगाबादचे काँग्रेसचे  नाराज नेते आमदार अब्दुल सत्तार यांनी घेतली मुख्यमंत्री यांची भेट 
मुंबई: काँग्रेसचे नाराज नेते औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस चे अध्यक्ष व सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. काँग्रेसनं औरंगाबादमधून विधान परिषदेचे सदस्य असलेल्या सुभाष झांबड यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानं सत्तार नाराज आहेत. त्यांनी झांबड यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली असताना सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने शिवसेनेचीही डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला आहे. 
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं औरंगाबादमधीन सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर सत्तार यांनी पक्षाविरोधात बंड केलं. सत्तार औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र तिकीट न मिळाल्यानं त्यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सत्तार यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुसाठी मागील अनेक महिन्यांपासून मी तयारी करत होतो. काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी गावोगावी फिरलो. एल्गार यात्रा काढली. कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. मात्र इतकं करुनही पक्षानं मला डावललं. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी काल स्पष्ट केलं. शिवसेनेनं औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली आहे.  त्यामुळे शिवेसेनेचे चंद्रकांत खैरे कॉंग्रेसचे सुभाष झांबड व बंडखोर अब्दुल सत्तार अशी लढत होण्याची शक्यता आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies