काँग्रेसला धक्का! डॉ. सुजय विखेंचा भाजप प्रवेश संपन्न: विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील काय निर्णय घेतील? याकडे सर्वांचे लक्ष. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, March 12, 2019

काँग्रेसला धक्का! डॉ. सुजय विखेंचा भाजप प्रवेश संपन्न: विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील काय निर्णय घेतील? याकडे सर्वांचे लक्ष.

काँग्रेसला धक्का! डॉ. सुजय विखेंचा भाजप प्रवेश संपन्न
माणदेश एक्सप्रेस न्युज 
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांनी अखेर भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. 
अहमदनगर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास नकार दिल्यानंतर सुजय यांनी हा निर्णय घेतला असल्याने  सुजय विखे नगर लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार असल्याने त्यांना  नगरच्या जागा विक्रमी मताने निवडून आणू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.  या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील काय निर्णय घेतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


No comments:

Post a Comment

Advertise