Type Here to Get Search Results !

मोटेवाडी(मा) उपसरपंचपदी सतिश मोटे बिनविरोध

माणदेश एक्सप्रेस न्यूज
माळशिरस/संजय हुलगे : मोटेवाडी (माळशिरस) च्या उपसरपंचपदी सतिश मोटे यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेवक  लता घुले यांनी दिली.
माजी उपसरपंच जयवंत मोटे यांनी राजीनामा दिल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपसरपंचपदासाठी सतिश मोटे यांचा एकमेव अर्ज आला. यामुळे ही निवड बिनविरोध झाल्याचे घोषीत केले. हि निवड सरपंच दारका खरात यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
यावेळी सदस्य जयवंत मोटे, ज्ञानदेव नामदास, नकुसा कोळेकर, कलावती ठेगल,आनंदाबाई हांडे,माजी सरपंच सुरेश मोटे, मधुकर दडस, काका माने, जगन्नाथ माने, दिलीप यमगर, नवनाथ ठेंगल, बापुराव देवकते, चंद्रकात रूपनवर, महादेव हांडे,दादासाहेब ठेंगल आदी  उपस्थित होते. निवड झाल्यानंतर गुलालाची आतिषबाजी व फटाक्या वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies