Type Here to Get Search Results !

एसीपी माडगुळकर यांचा जन्मभूमीत आज दि. १६ रोजी होणार नागरी सत्कार : खास. संजयकाका पाटील यांची प्रमुख उपस्थिती

एसीपी माडगुळकर यांचा जन्मभूमीत आज नागरी सत्कार
 माणदेश एक्सप्रेस न्युज
माडगुळे/नंदकुमार विभुते : माडगुळे गावचे सुपुत्र राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त देहू रोड पिंपरी चिंचवड चे सहाय्यक पोलीस आयुक्त गणपतराव माडगूळकर यांचा माडगुळे येथे शनिवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र पोलिस सेवेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल भारताचे महामहिम राष्ट्रपती यांनी देहू रोड पिंपरी चिंचवड चे सहाय्यक पोलीस आयुक्त गणपतराव माडगूळकर यांना राष्ट्रपती पोलीस पदक बहाल केले आहे. त्यानिमित्त शनिवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांची जन्मभूमी माडगुळे येथील गदिमा पारावर भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते व खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिलभाऊ बाबर, सांगोल्याचे माजी आमदार एडवोकेट शहाजीबापू पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, पुणे येथील साखरआयुक्त शेखर गायकवाड, पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप, मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे, मदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव अरुण उन्हाळे, पुण्याचे उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, सोलापूर येथील ज्येष्ठ विधिज्ञ एडवोकेट धनंजय माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अण्णासाहेब पत्की, तानाजीराव पाटील, माणगंगा उद्योगसमूहाचे अध्यक्ष आनंदराव पाटील, विटा चे पोलीस उपाधीक्षक अमरसिंह निंबाळकर, सावित्रीदेवी उद्योगसमूहाचे संस्थापक भारततात्या पाटील, मंगळवेढ्याचे पोलीस उपअधीक्षक दिलीप जगदाळे, वसंतराव दूध संघाचे अध्यक्ष विष्णुपंत पाटील, सांगोला तालुका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, निवृत्त पोलीस उपअधीक्षक अशोक शेजाळ, संग्राम पाटील, ग्रामपंचायतीचे सरपंच संजय विभुते, निवृत्त पोलिस उपाधीक्षक रामचंद्र ढगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगोला तालुकाध्यक्ष तानाजीकाका पाटील, शिवाजी विद्यापीठाचे माजी संचालक डॉ. भालबा विभूते, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी, तासगावचे पोलीस निरीक्षक अजय शिंधकर यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies