Type Here to Get Search Results !

आटपाडीतील ब्राम्हणगल्ली येथील श्री दत्त मंदिरात ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न

आटपाडी-गोंदवलेकर महाराज
जन्मोत्सवानिमित पालखी मिरवणुकीत
सहभागी भाविक
आटपाडीतील ब्राम्हणगल्ली येथील श्री दत्त मंदिरात ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/वार्ताहर: आटपाडी येथील ब्राम्हण गल्लीतील श्री. दत्त मंदिरात ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जन्मोत्सवानिमित्त गोंदवलेकर महाराज आरती मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
पहाटे ५.०० वाजता काकड आरतीने जन्मोत्सवास सुरुवात झाली. ७.०० वाजता आरती आणि 9.००  वाजता जन्मोत्सवाचा कार्यक्रम झाला. सकाळी १०.०० वाजता शहरातून पालखी मिरवणूक निघाली. या पालखीचे ग्रामस्थांनी रांगोळ्या काढून मोठया भक्तिभावाने स्वागत केले. 
दुपारी 12 ते 4 या कालावधीत महाप्रसाद झाला. सायंकाळी 6 वाजता आरती आणि रात्री भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies