Type Here to Get Search Results !

अट्टल दरोडेखोर बारा तासांच्या आत अटकेत ; नातेपुते पोलिसांची कामगिरी


अट्टल दरोडेखोर बारा तासांच्या आत अटकेत ; नातेपुते पोलिसांची कामगिरी

माणदेश एक्सप्रेस न्युज
नातेपुते/प्रतिनिधी : कुरबावी येथील रहिवाशी असलेले राजेंद्र नंदकुमार दोभाडा यांनी नातेपुते पोलीस ठाणेस फिर्याद दिली की, रात्री ८:३० वाजता त्यांचे किराणा मालाचे दुकान बंद करीत असताना किराणा माल खरेदी करण्याच्या बहाण्याने पाच अनोळखी इसमाने त्यांच्या दुकानात प्रवेश करून शटर आतून बंद करून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केली व त्यानंतर घरात शिरून त्याचे वडिलांना सत्तूरने धमकी देऊन कपाटातील रोख रक्कम चाळीस हजार, अंगावरील दोन अंगठय़ा, आईचे मंगळसूत्र, कर्णफुले, मोबाईल असा एकूण १ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावून घेतला. तसेच त्यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादी यांनी आता दहा लाख रुपये नाही, असे सांगितल्यावर उद्या त्याची पूर्तता करा अशी मागणी दरोडेखोरांनी केली. त्यानंतर त्यांचे हातपाय बांधून १०:३० वाजता घरातून बाहेर पळून गेले.
फिर्यादी यांच्या तक्रारीवरून नातेपुते पोलीस ठाणेस गुन्हा दाखल झाला असून सदर घटनेची माहिती मिळताच मंगेश चव्हाण एसडीपीओ सो अकलूज त्यांचे डिटेक्शन पथकासह व सपोनि भुजबळ, पोसई किनगे असे पोलीस ठाणे स्टाफसह घटनास्थळी पोहोचले. 
आरोपींचे प्राप्त वर्णनावरुन आरोपी बारामती व दौंड परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले.त्यावरून बारामती येथून १)संकेत सुनील जाधव रा. बारामती २) मारी उर्फ रोहित विजय अडकित्ते  रा. बारामती ३)वैभव बाळासाहेब आरवडे रा. मांडवगण फराटा ता.शिरूर जिल्हा पुणे ४) जयेश नागेश फासगे वय २० रा. बाभूळसर बुद्रुक ता. शिरूर जि. पुणे ५) सोमनाथ रामचंद्र गायकवाड वय २१ रा.कुरभावी ता. माळशिरस या आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणलेला असून इतर आरोपींचीही नावे निष्पन्न केलेली आहेत.
गुन्ह्यातील आरोपीपैकी गणेश रणपिसे या आरोपी ने बारामती येथे अनेक जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे केलेले आहेत. सदर आरोपींना अटक करताना कुरबावी ग्रामस्थ तसेच कुरबावीचे पोलीस पाटील दनाने, बापु दनाने यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे व त्यांनी पळून जाणाऱ्या आरोपींच्या काढलेल्या फोटोमुळे सदर आरोपींना अटक करणे शक्य झाले.
मनोज पाटील, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज, सपोनि भुजबळ नातेपुते, पोसई किनगे यांनी बारा तासाच्या आत अटक केले. सदर कामगिरीमध्ये अकलूज उपविभाग डिटेक्शन स्कॉडचे पोलीस हवालदार श्रीकांत निकम, विकी घाडगे, विशाल घाडगे, समीर पठाण, अजित कडाळे व नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार शिंदे,पोलीस हवालदार काझी यांनी रात्रभर आरोपींचा शोध घेत आरोपींना ताब्यात घेतले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि भुजबळ करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies