Type Here to Get Search Results !

भाजपा म्हणजे विकास हेच गणित: पालकमंत्री विजयकुमार देशमुख : माळशिरस तालुक्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते आठ कोटी रुपयाच्या रस्त्यांचे उदघाटन

भाजपा म्हणजे विकास हेच गणित: पालकमंत्री विजयकुमार देशमुख
 माळशिरस तालुक्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते आठ कोटी रुपयाच्या रस्त्यांचे उदघाटन
माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे: माळशिरस-निमगाव-पिलीव-इटकी व जांभूड-खंडाळी-निमगाव-मळोली या दोन रस्त्यांचे भूमिपूजन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले. आठ कोटी साठ लाख रुपयाचा खर्च या रस्त्यासाठी आहे. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय भेटावा यासाठी भाजपा सरकार कार्यरत असते असे मनोगत पालकमंत्री देशमुख यांनी व्यक्त केले. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या मोठ्या रस्त्यांचे काम मार्गी लागल्याने जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
तालुक्यात भाजपाकडून होणाऱ्या कामाचे श्रेय लाटण्याचा उद्योग काही तथाकथित नेते करत आहेत. या तालुक्याची सत्तर वर्षात विकासाबाबत विवंचना झाली. परंतु भाजपा सरकार  काळात तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्ते आणि विकासकामे होत आहेत. आयत्या पिठावर रेषा मारायचं काम राष्ट्रवादी कडून होत असल्याच भाजपा नेते के.के.पाटील म्हणाले.
याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राम सातपुते यांनी भाजपा सरकार हे कर्मयोगी आणि अंत्योदयासाठी आग्रही आहे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई पाटील, पंचायत समिती सदस्य रणजितबापू जाधव,  निमगावच्या सरपंच आरती मगर, मळोलीचे सरपंच गणेश पाटील, निमगावचे माजी सरपंच व भाजपाचे जेष्ठ नेते प्रभाकरआप्पा मगर, शाम मदने, दापूरीचे सरपंच भजनदास चोरमले, पिलीवचे संग्राम पाटील, आरीफखान पठाण, महावीर पाटील, तुषार लवटे, संजय पाटील, नाना मगर, भाजपा युवा नेते किरण  पाटील, कुसमुडच्या सरपंच लोखंडे  तसेंच निमगाव जि.प. गटातील  ग्रामस्थ आणि भाजपा कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies