आण्णा हजारे यांचे मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थी नंतर उपोषण मागे : बहुतांश मागण्या मान्य केल्या: आण्णा हजारे; गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांची प्रमुख उपस्थिती - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, February 5, 2019

आण्णा हजारे यांचे मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थी नंतर उपोषण मागे : बहुतांश मागण्या मान्य केल्या: आण्णा हजारे; गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांची प्रमुख उपस्थिती

आण्णा हजारे यांचे मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थी नंतर उपोषण मागे 
बहुतांश मागण्या मान्य केल्या: आण्णा हजारे; केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांची प्रमुख उपस्थिती 
माणदेश एक्सप्रेस न्युज
राळेगणसिद्धी: आपल्या विविध मागण्यांच्या संदर्भात उपोषणास बसलेले ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मध्यस्थीनंतर सातव्या दिवशी उपोषण मागे घेतले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आण्णांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या असून असून पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री यांनी पत्र देऊन त्या पत्राचा खुलासा व केलेल्या कारवाईचे पत्रही त्यांनी दिले आहे.
आण्णा हजारे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी बहुतांश मागण्या मान्य केल्या असून बहुतांश मागण्यावर तोडगा निघालेला आहे. यामध्ये लोकपाल. शेतीमालाला दीडपट हमीभाव मागणीवरही ते समाधानी असल्याचे समजते. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आण्णा हजारे यांच्याशी तब्बल सहा तास चर्चा करून त्यांच्या विविध मागण्या मान्य केल्या असून यामध्ये दीडपट हमीभाव लोकपाल यासारख्या यांचाही समावेश आहे. राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise