आटपाडी येथील गोपीनाथ उर्फ राजू आनंदराव जाधव याचा अपघातामध्ये मृत्यू - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, February 4, 2019

आटपाडी येथील गोपीनाथ उर्फ राजू आनंदराव जाधव याचा अपघातामध्ये मृत्यू

मयत गोपीनाथ उर्फ राजू आनंदराव जाधव
आटपाडी येथील गोपीनाथ उर्फ राजू आनंदराव जाधव याचा अपघातामध्ये मृत्यू 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/वार्ताहर: मोटारसायकल व टमटम अपघातात आटपाडी येथील तरुण गोपीनाथ उर्फ राजू आनंदराव जाधव व.व. ३६ मुळगाव किणीवाठर. ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर सध्या मुक्काम आटपाडी हा जागीच ठार झाला. ही घटना रात्री आठच्या सुमारास आटपाडी शेटफळे रस्त्यावर घडली. गोपीनाथ उर्फ राजू जाधव हा मोटरसायकल क्रमांक एमएच-१०-सीपी८९३९ वरून आटपाडीतून गोंदिरामळ्याकडे जात असताना, जुनोनी कडून येणाऱ्या बाजार मालवाहतूक टमटम व मोटारसायकल यांचा अपघात कवडेमळा मासाळवाडी तेशेटफळे रस्त्यावर येथे झाला. हा अपघातात राजू जाधव याच्या पायास व कमरेखालील मार लागल्याने तो जागीच ठार झाला. राजू जाधव याच्या पाठीमागे पत्नी,  दोन मुले  असा परिवार आहे. या घटनेची माहिती आटपाडीत कळताच बघणार्यां ची मोठी गर्दी झाली. राजू जाधव याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणला आहे. साई मंदिर परिसरात या घटनेची माहिती कळताच दुःखाचे सावट पसरले आहे. या अपघाताची माहिती मिळताच आटपाडी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.


No comments:

Post a Comment

Advertise