Type Here to Get Search Results !

माळशिरस तहसील कार्यालयाला लागलं, किसान सन्मान योजनेचे याड : तहसिल कार्यालयात रात्री उशीरापर्यंत किसान सन्मान योजने काम चालु

 माळशिरस: येथील तहसील कार्यालयामध्ये किसान सन्मान योजना ची माहिती भरण्यासाठी रोजगारसेवक, ग्रामसेवक, सोसायटी सचिव, तलाठी यांची झालेली गर्दी 
माळशिरस तहसील कार्यालयाला लागलं, किसान सन्मान योजनेचे याड
तहसिल कार्यालयात रात्री उशीरापर्यंत किसान सन्मान योजने काम चालु
माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे: माळशिरस निवडणुकीच्या तोंडावर नुकतीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी घोषित केलेली किसान सन्मान योजना ही अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असणारी योजना आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांचे बँक खाते, आयएफएससी कोड,  आधार कार्ड, ७ / १२, ८ अ उत्तारा, मोबाईल नंबर अशी माहिती संकलन करण्याचे काम सध्या प्रत्येक गावातील तलाठी करत आहेत. तहसिल कार्यालयामध्ये अनेक दिवसापासुन काम सुरू आहे. व प्राप्त माहिती ऑनलाइन भरण्याचे काम तहसील कार्यालयामध्ये युद्धपातळीवर सुरू आहे. तालुक्यामध्ये जवळपास अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या १ लाख १५ हजार  आहेत. पण  आत्तापर्यंत  ७ ते ८ हजार शेतकऱ्यांनी  आपली  माहिती संबंधित कार्यालयाकडे जमा केली आहे. त्यामुळे बाकी  शेतकऱ्यांची  माहिती गोळा करत असताना महसूल कर्मचाऱ्यांची दमछाक होताना दिसत आहे. यामुळे असे चित्र निर्माण झाले आहे की जणू, तहसील कार्यालयाला किसान सन्मान योजनेचे याड लागलं आहे.
अशा येतायत आडचणी
सरकारने हे योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी लागू केली आहे. पण काही शेतकऱ्यांची बँक खाते ही खाजगी पतसंस्थांमध्ये आहेत. तर काहींच्या हाताचे ठसे त्यांच्यात आधार कार्डला मॅच होत नाहीत. तर काही शेतकऱ्यांची बँकेत खातीच नाहीत. व कुटुंबातील ज्याचं खाते बँकेत आहे, पण त्यांच्या नावे जमीन नाही. तर काही ठिकाणी तुमच्याकडे शेतसारा आहे, तो भरल्याशिवाय अर्ज घेणार नाही. किंवा अर्ज घेण्यासाठी २०० रुपये फी लागेल. अशाही तक्रारी ऐकण्यास मिळतात. त्यामुळे ही योजना जरी सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रभावीपणे राबवण्याचे काम केले तरी, म्हणावी तेवढी यशस्वी होईलच असे नाही.  या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तहसील कार्यालयाचे कर्मचारी निम्या रात्रीपर्यंत जागून कार्यालयांमध्येच शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइन भरतायेत. माहिती संकलन लवकर होण्यासाठी तहसील कार्यालयाच्या मार्फत  तलाठी कार्यालया बरोबर   माहिती संकलन पथकाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये  रोजगारसेवक, ग्रामसेवक ,विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव, यांचा समावेश आहे तरी  शेतकऱ्यांनी आपापली कागदपत्रे   लवकरात लवकर जमा करावीत अशी माहिती माळशिरसचे कर्तव्यदक्ष तहसीलदार अभिजीत पाटील यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies