माळेवाडीत प्रधानमंत्री उज्वला योजनेतून गॅसचे वाटप - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, February 10, 2019

माळेवाडीत प्रधानमंत्री उज्वला योजनेतून गॅसचे वाटपमाळेवाडीत प्रधानमंत्री उज्वला योजनेतून गॅसचे वाटप

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/वार्ताहर : माळेवाडी येथे गणपती   मंदिरात गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये प्रधानमंत्री उज्वला  योजनेतून घरगुती गॅसचे वाटप विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील, आटपाडी पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख, जिल्हा परिषद सदस्या वंदनाताई गायकवाड, सरपंच शालिनीताई जगताप, सुरेश इंडेन  गॅसचे मालक दत्तात्रय चव्हाण, ज्येष्ठ नेते महादेव जगताप, पोलीस पाटील दत्तात्रय साळुंखे, अनिल जाधव, सुरेश पवार, हारुण मुजावर, पात्रेवाडी चे माजी सरपंच अनिल गायकवाड, शेटफळचे उपसरपंच विजय गायकवाड, शेटफळे विकास  सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र गायकवाड, ग्रामसेविका पूनम ढूमसे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना वैभवदादा पाटील म्हणाले, माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांनी दहा वर्षात आमदार असताना या गावाचा विकास करताना कोठेही कमी पडले नाहीत. विकासकामे करत असताना त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. अगदी त्याच पद्धतीने इथून पुढे आपण सर्वजण एकत्र राहून विकास कामाचा डोंगर उभा करू, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

आटपाडी पंचायत समिती सभापती हर्षवर्धन देशमुख बोलताना म्हणाले, माळेवाडीतील ग्रामस्थांना कोणतीही अडचण असेल तर त्यावर निश्चितपणे आपण तोडगा पंचायत समितीच्या व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काढू, असे प्रतिपादन त्यांनी माळेवाडी ग्रामस्थांना उद्देशून केले.

No comments:

Post a Comment

Advertise