Type Here to Get Search Results !

“उचल बुडव्यानी” आपली पात्रता ओळखून लोकांची उचल घेऊन कोणावर टीका करू नये- बाबा वाघमारे : उसमजुरांचे पैसे हडपणाऱ्यांनी आम्हांला निष्ठा शिकवू नये


“उचल बुडव्यानी” आपली पात्रता ओळखून लोकांची उचल घेऊन कोणावर टीका करू नये- बाबा वाघमारे
उसमजुरांचे पैसे हडपणाऱ्यांनी आम्हांला निष्ठा शिकवू नये
माणदेश एक्सप्रेस न्युज
दिघंची/अक्षय बनसोडे: सहा वेळा पराभव झाला म्हणून संजय वाघमारे यांच्यावर टीका केली. परंतु टीका करणाऱ्या व्यक्तीला जालना येथे शेतकऱ्यांनी कपडे काढून एका खोलीत बसवला होतं त्यावेळी त्यांची सुटका संजय वाघमारे यांनीच केली हे ते विसरले. ज्यावेळी दिघंची मध्ये प्रस्थापित लोकांविरुद्ध तिसरी आघाडी तयार झाली त्यामध्ये संजय वाघमारे यांचा सिंहाचा वाटा होता. आज दिघंची ग्रामपंचायत मध्ये त्या आघाडी चा सरपंच आहे. या सगळ्या वाटचालीत संजय वाघमारे यांचा सिंहाचा वाटा आहे. ऊस मजुरांचे पैसे हडपणाऱ्या लोकांनी संजय वाघमारे यांच्यावर टीका करणे कितपत योग्य आहे असा पलटवार दिघंचीचे युवा नेते बाबा वाघमारे यांनी कसून शेखर रणदिवे यांनी केलेल्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
संजय वाघमारे 6 वेळा निवडणूक हरले तरी दिघंची च्या सरपंचपद  मिळवण्यात   संजय वाघमारे यांचा सिंहाचा वाटा आहे हे दिघंचीकराना माहीत आहे. त्यांची निष्ठा आजही आमदार अनिलभाऊ बाबर, तानाजीराव पाटील यांच्यावर आहे. पण त्यांच्यावर टिका करणारे  आपला नेता व पक्ष दरवर्षी व प्रत्येक निवडणुकीला बदलत असतात. अमेरिकेचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन तर 32 निवडणूका हरले म्हणून त्यांनी लढणे सोडले नाही व राष्ट्राध्यक्ष झाले. त्यामुळे जिंकणे आणि हरणे यावरून माणसाची पात्रता ठरत नसते. पात्रता ही निष्ठेवर ठरते आणि आपली व आपल्या नेत्याने आतापर्यंत किती नेते व पक्ष बदलले हे तालुक्यातील लोकांना माहीत आहे. 
संजय वाघमारे यांच्या कर्तृत्वामुळे व निष्ठेमुळे त्यांना नेत्यांनी महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजना समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली. ऊसतोडणी टोळीच्या नावाखाली पैसे उचलायचे आणि गोरगरिबांना लुटायचे धंदे त्यांनी केले नाहीत. शेखर रणदिवे याना एका बंद खोलीत उचल घेतलेल्या शेतकऱ्यांनी बसवले होते. त्यावेळी तेथून त्यांची सुटका संजय वाघमारे यांनीच केली होती. कोणता नेता त्यावेळी वाचवायला आला होता हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे “उचल बुडव्यानी” आपली पात्रता ओळखून लोकांची उचल घेऊन कोणावर टीका करू नये.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies