Type Here to Get Search Results !

१२ मोटारसायकलसह बुलेट चोरांना नातेपुते पोलीसांनी ठोकल्या बेड्या : डीवायएसपी स्कॉड अकलुज व नातेपुते पोलीसांची कारवाई

१२ मोटारसायकलसह बुलेट चोरांना नातेपुते पोलीसांनी ठोकल्या बेड्या
डीवायएसपी स्कॉड अकलुज व नातेपुते पोलीसांची कारवाई
माणदेश एक्सप्रेस न्युज
नातेपुते/प्रमोद शिंदे: नातेपुते पोलीस स्टेशन हद्द व माळशिरस तालुक्यात मोटारसायकल चोरीचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता सपोनि राजकुमार भुजबळ व ASI राजाराम शिंदे आणि हे.कॉ.अस्लम काझी यांनी आरोपींची माहिती काढण्यासाठी गोपनीय यंत्रणा सतर्क करून ३ संशयीत इसमांना निष्पन्न केले होते. त्यानुसार सपोनि राजकुमार भुजबळ यांनी पो.स्टे. स्टाफ व डीवायएसपी स्कॉड यांना सोबत घेऊन ३ संशयीत आरोपी १) हरी तानाजी शिरतोडे रा.फोंडशिरस २) अक्षय संजय बोडरे रा. फोंडशिरस ३) महादेव उर्फ सोनु अशोक चव्हाण  रा. घुमेरा(वेळापूर) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबूली दिली असून चोरीच्या १२ गाड्या त्यांच्याकडून जप्त केल्या आहेत. जप्त गाड्यांमध्ये ५ बुलेट, २ शाईन, १ यूनिकॉर्न , एच एफ डिलक्स अशा गाड्यांचा समावेश असून १२ लाख किमतीच्या गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. 
चोरीच्या गाड्यांबाबत पो.स्टे. अकलूज, माळशिरस, सांगोला, टेंभुर्णी, बारामती, पंढरपुर, आटपाडी, सांगली, नातेपुते याठिकाणी गुन्हे दाखल आहेत. सदर कामगिरी मनोज पाटील पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि भुजबळ, सुशांत किनगे, एएसआय राजाराम शिंदे, अस्लम काझी, श्रीकांत निकम, विशाल घाडगे, पो.हवा. गडदे, राजेंद्र चौधरी, सचिन सूर्यवंशी, सचिन कांबळे, अमित जाधव, विकी घाडगे, अजित कडाळे, सलीम पठाण यांनी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies