Type Here to Get Search Results !

वॉटर कप स्पर्धा 3 मध्ये तालुकास्तरीय प्रथम तीन क्रमांक आलेल्या आवळाई, औटेवाडी, पिंपरी बुद्रुक गावांना शासकीय निधी प्रदान

वॉटर कप स्पर्धा 3 मध्ये तालुकास्तरीय प्रथम तीन क्रमांक आलेल्या आवळाई, औटेवाडी, पिंपरी बुद्रुक गावांना शासकीय निधी प्रदान 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/अक्षय बनसोडे: पाणी फौंडेशन वॉटर कप स्पर्धा 3 सन २०१८ स्पर्धेतील आटपाडी तालुक्यातील  तालुकास्तरीय विजेत्या ठरलेल्या गावांना शासकीय निधी, बक्षीस रक्कम तलाठी, पाणी फौंडेशन समनवयक यांचे द्वारे ग्रामसेवक, सरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांचेकडे  अनुक्रमे पाच लाख, पाच लाख, तीन लाख, रकमेचे चेक सुपूर्द करणेत आले. आटपाडी  (महसुली गाव शेरेवाडी) औटेवाडी, पिंपरी बुद्रुक या ग्रामपंचायतींना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक विजेत्या गावांना चेक देणेत आले व तो निधी जलसंधारण कामांच्या देखभाल दुरुस्तीस वापरण्यात यावा अशा सूचना ही यावेळी करण्यात आल्या. सरपंच, ग्रामसेवक यांचे संयुक्त खातेवर ही रक्कम ठेवणे विषयी माहिती देवून  निधी वापराचे  शासकीय पत्र यावेळी देणेत आले. यावेळी टीम पाणी फौंडेशन, ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.
सदरच्या रकमेचा चेक आवळाई ग्रामपंचायत येथे सरपंच बाबासाहेब जाधव, तलाठी कांबळे, ग्रामसेवक ऐवळे पाणी फौंडेशनचे तालुका समन्वयक सुहास पाटील, सागर गहानवट उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies