महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेची बैठक संपन्न: बैठकीसाठी जयवंत सरगर यांनी विशेष प्रयत्न केले. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, January 29, 2019

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेची बैठक संपन्न: बैठकीसाठी जयवंत सरगर यांनी विशेष प्रयत्न केले.

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेची बैठक संपन्न
 माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : डीसीपीसी  कपातीचा हिशोब अचूक करून  आजपर्यतच्या  हिशोब चिठ्या सर्व डीसीपीसी बांधवांना मिळाव्यात यासाठी शिक्षण विभाग आटपाडी, सर्व डीसीपीसी यांची संयुक्त बैठक पंचायत समिती सभागृह आटपाडी याठिकाणी यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीत  आजपर्यंतच्या सर्व अचूक हिशोब चिठ्या मिळाव्यात, ज्यांचे डीसीपीसी खाते नाही ते त्वरित काढावे, आंतरजिल्हाबदलीने आलेल्या शिक्षाकांचे खाते उघडणे यावर चर्चा झाली. सर्व डीसीपीसी धारकांचे हिशोब रजिस्टर अद्यावत करून घेणेसाठी स्वतः रजिस्टर पूर्ण करून ते तपासण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कुडाळकर यांच्या नियोजनानुसार दि २६ फेब्रु. रोजी ठीक 12 वा. पंचायत समिती आटपाडी येथे बैठक लावण्यात येणार आहे.
तसेच ज्यांचे डीसीपीसी खाते उघडले नसेल त्यांचे खाते उघडण्यासाठी 1/2/2019 पर्यंत अर्ज करावेत व खाते उघडून घ्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या बैठकीला पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख, उपसभापती सौ.पुष्पाताई सरगर,जयवंत सरगर, गटशिक्षणाधिकारी कुडाळकर, विस्तार अधिकारी दत्तात्रय मोरे, डीसीपीसी बांधव उपस्थित होते. या बैठकीसाठी जयवंत सरगर यांनी विशेष प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment

Advertise