कडेगाव येथे मोफत आरोग्य व दंत तपासणी शिबीर संपन्न : महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष आमदार जगन्नाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, January 29, 2019

कडेगाव येथे मोफत आरोग्य व दंत तपासणी शिबीर संपन्न : महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष आमदार जगन्नाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन

कडेगाव येथे मोफत आरोग्य व दंत तपासणी शिबीर संपन्न
 माणदेश एक्सप्रेस न्युज
कडेगाव/प्रतिनिधी : कडेगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे व महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष आमदार जगन्नाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या श्री शिवप्रभु विद्यालयात मोफत आरोग्य शिबीर व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे चेअरमन विजयभाऊ पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कडेगावच्या तहसिलदार अर्चना शेटे,पंचायत समितीचे मुख्याधिकारी राहुल देसाई,जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगे, डॉ. मकरंद बर्वे, डॉ. अरूण रेणुशे,विश्वास व्यास शासकीय दारूबंदी कडेगाव तालुका सदस्य सुनिल मोहीते,अभिमन्यु वरूडे, सामाजिक कार्यकर्ते डी.एस. देशमुख उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगे यांनी  श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यालयातील एकुण ६००  विद्यार्थी, विद्यार्थीनींची दंत तपासणी करून कोलगेट,पेस्ट,टुथब्रश व टॉनिक चे वाटपही करण्यात आले. यावेळी समरजित गायकवाड,महावीर माळी,राजवर्धन लोखंडे,प्रताप पंडीत,प्रकाश सुर्यवंशी,अमोल वरूडे, यांचेसह शिवप्रभु विद्यालयाचे मुख्याध्यापक ,शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. आभार प्रा.प्रविण कदम यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Advertise