श्रीपुर मध्ये शिधापत्रिका वाटप - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 6, 2018

श्रीपुर मध्ये शिधापत्रिका वाटप


श्रीपुर मध्ये शिधापत्रिका वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/प्रतिनिधी: सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी केलेल्या कार्यातून जो आनंद आणि समाधान मिळते  ते सर्वश्रेष्ठ असते असे मत शिवशंकर सहकारी बाजार च्या अध्यक्षा स्वयंप्रभादेवी मोहिते यांनी व्यक्त केले. शिव-किर्ती युवा मंचच्या वतीने श्रीपुर येथे माजी खासदार  रणजितसिंह मोहिते  यांच्या हस्ते शिधापत्रिका वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना स्वयंप्रभादेवी मोहिते म्हणाल्या की, कै. उदयसिंह  मोहिते-पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवकिर्ती युवा मंचने नागरिकांना  शिधापत्रिका मिळवून देण्यासाठी गावोगावी मेळावे आयोजित केले होते. त्या मेळाव्यात ज्या कुटुंबांनी कागदपत्रे सादर करून प्रस्ताव दिले होते त्यांना आज शिधापत्रिका वाटप करताना खूप आनंद होत आहे. सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा मंच कार्य करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत नागरिकांपुढे अनेक समस्या निर्माण होणार आहेत. खंबीर मनाने दुष्काळाचा सामना करण्यासाठी आपण सर्वजण तयार राहू असे त्या म्हणाल्या. सहकार महर्षी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र सावंत  म्हणाले, कै.उदयसिंह मोहिते पाटील यांचा महाळुंगशी खूप मोठा ऋणानुबंध होता. या परिसरावर त्यांनी विशेष लक्ष दिल्याचे ते म्हणाले. माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार विजयसिंह मोहिते हेच उमेदवार असतील याबाबत त्यांनी विश्वास व्यक्त केला. श्रीपुर येथील या कार्यक्रमात ६५१ कुटुंबांना शिधापत्रिका वाटण्यात येत असल्याचे शिवकिर्ती युवा मंच अध्यक्ष तथा अकलूज चे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमास सरपंच उषा भोसले, नानासाहेब मुंडफणे, संभाजी घोंगाणे, अरुण तोडकर, डॉ. हरिश्चंद्र सावंत, ज्ञानेश्वर मुंडफणे, विजय प्रताप युवा मंचचे रतनसिंह रजपुत,  विजय भोसले, अनिल मुंडफणे, डॉ. संजय घोंगाणे, संदीप घाडगे, रमेश देवकर, संदिपान काळे, देविदास काळे, मंडलधिकारी  सोमनाथ साळुंखे, तलाठी सिद्धेश्वर भोसले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise