श्री. शंकर कारखाना निवडणूक; इस्लामपूर गटातून रामदास कर्णे, अमित माने, दत्तात्रय रणनवरे विजयी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 27, 2018

श्री. शंकर कारखाना निवडणूक; इस्लामपूर गटातून रामदास कर्णे, अमित माने, दत्तात्रय रणनवरे विजयी


श्री. शंकर कारखाना निवडणूक 
इस्लामपूर गटातून रामदास कर्णे, अमित माने, दत्तात्रय रणनवरे विजयी
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे: श्री. शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर या साखर कारखान्याची मतमोजणी सुरू असुन खा. विजयसिंह मोहीते पाटील गटाने इस्लामपूर गटातून रामदास कर्णे, अमित माने, दत्तात्रय रणनवरे विजयी यांनी विजयी पताका फडकविल्याने आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार ६ उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये रामदास कर्णे ४०९१, अमित माने ४१०४, दत्तात्रय रणनवरे ४०६१ यांनी मोठ्या परंतु एकतर्फी विजय मिळवला असे म्हणावे लागेल. तर विरोधी गटाच्या शहाजी कदम १०७८, बबुताई पवार ११२४, उत्तम बाबर १०६५ एवढी मते मिळाली. 
माळशिरस गट क्र. १ व इस्लामपूर या दोन्ही गटातील पॅनेल टू पॅनेल मतदान झाल्याने ६ उमेदवार निवडून आल्याने खा. विजयसिंह मोहिते-पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यात सुरुवात केली असून आज माळशिरस गुलालात न्हाऊन निघाले असून, गुलाल आमचाच ही पोस्ट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. 
निवडणुकीच्या अधिक माहितीसाठी आमच्या www.mandeshexpress.com या वेबसाईट ला भेट द्या.

No comments:

Post a Comment

Advertise