आरोग्य विभागाला अखेर आली जाग - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 16, 2018

आरोग्य विभागाला अखेर आली जाग


आरोग्य विभागाला अखेर आली जाग
महाळुंग व परिसरात आरोग्य विभागाचे पथक दाखल
माणदेश एक्सप्रेस न्युज 
श्रीपूर/वार्ताहर: श्रीपूर :ता .माळशिरस येथील गट नंबर 2 याठिकाणी १२०० लोकांना डेंग्यूची लागण झाल्याचे समजल्यावर आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेत सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी या ठिकाणी भेट दिली. तसेच 16 टीम तयार करून या भागात कंटेनर सर्व्हेचे काम युद्धपातळीवर चालू केले आहे.  डॉ. विजय बागल सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी, डॉ. समीर शेख महाळूग प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी हे प्रत्यक्ष घटनास्थळी  तळ ठोकून पाहणी करत आहेत. 
माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील आरोग्यसेवक, आशा स्वयंसेवक यांची टीम तयार करण्यात आली आहे. यात श्रीपुर भागांमध्ये ६ टीम ,गट नंबर २ भागात ७ टीम, महाळुंग भागात २  टीम अशा 16 टीमवर काम युद्धपातळीवर चालू केले आहे. यांच्यामार्फत प्रत्येक घराचा कंटेनर सर्व्हे करून ज्या ठिकाणी डेंगूच्या आळ्या आढळल्या त्या ठिकाणी त्याचा नाश करणे, जेथे पाण्याची डबकी साचली आहे त्याचे निवारण करणे, लोकांना शोषखड्डा बनवण्यासाठी जनजागृती करणे, कोरडा दिवस पाळणे आव्हान करीत आहेत.


महाळुंग श्रीपुर गट नंबर 2 या भागांमध्ये कर्मचाऱ्यांची टीम प्रत्येकाच्या घरी जाऊन कंटेनर सर्व्हे करीत आहेत व लोकांची जनजागृती करण्याचे काम चालू आहे.
डॉ. समीर शेख
प्राथमिक आरोग्य केंद्र महाळुंग,वैद्यकीय अधिकारी

फवारणीचे काम हाती घेऊन गट नंबर २ वरील सर्व गटारी साफ करून जंतुनाशक पावडर टाकणार आहे. या भागात दर रविवारी कोरडा दिवस पाळण्याचे आव्हान केले आहे.
उषाताई विजय भोसले
सरपंच ग्रामपंचायत, महाळुंग 

No comments:

Post a Comment

Advertise