आटपाडी तालुकयात डाळिंब प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, November 19, 2018

आटपाडी तालुकयात डाळिंब प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज


आटपाडी तालुकयात डाळिंब प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज
आ. अऩिल बाबर: मिटकी येथे  पाझर तलाव व संत बाळूमामा मंदिर संरक्षक भिंत काम शुभारंभ  
माणदेश एक्सप्रेस न्युज 
खरसुंडी/मनोज कांबळे: आटपाडी तालुक्यात डाळिंब प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज आहे असे प्रतिपादन खानापूर-आटपाडी आमदार अनिल बाबर यांनी केले. मिटकी येथे पाझर तलाव व संत बाळूमामा मंदिर संरक्षक भिंत शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. तालुक्यात विविध प्रकारचे डाळिंबावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारल्यास आटपाडी सांगली जिल्ह्यात सर्वात श्रीमंत तालुका होईल असे मत आ. बाबर यांनी मांडले. त्यासाठी शेतकऱ्यांनी संघटितपणे पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी माजी जि.प.सदस्य तानाजी पाटील, श्रीरंग कदम, शिवाजीराव कदम,  जगन्नाथ कोळपे, हणमंत पडळकर, मिटकी गावचे सरपंच दादा कोळेकर, उपसरपंच सौ. वंदना जरग, चंद्रकांत कोळेकर, पोलीस पाटील किसनदेव यमगर, दादा पडळकर, जालिंदर कटरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कायम दुष्काळाने गांजलेल्या आटपाडी तालुक्यात टेंभूचे पाणी आल्यामुळे दुष्काळाची दाहकता कमी झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीत देखील संकटांना सामोरे जाऊन गरज असेल तिथे पाणी देण्याचा प्रयत्न केला जाईल, मिटकीतील बऱ्याच वर्षापासून अपूर्ण अवस्थेतील पाझर तलावासाठी कोळपे गुरुजींनी पाठपुरावा केला,  गावाला या पाझर तलावाचा निश्चित फायदा होईल. आटपाडी तालुक्यात दळणवळण, विकासाच्या दृष्टीने जुने रस्ते दुरुस्त करुन मिटकीला जोडणारे नवीन रस्त्यांची कामे करणार असल्याचे आ. बाबर यांनी सांगितले. मतभेद हे निवडणुकीपुरते असावेत, जातीचे राजकारण होत नसते, लोकांनी  जातीपातीचा विचार न करता विकास कामे करणाऱ्यांच्या पाठीशी ताकद उभारली पाहिजे. तसेच संत बाळूमामा यांचे मंदिर गतीने उभा राहील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मिटकी येथे पाझर तलावाचे काम गेल्या वीस वर्षापासून प्रलंबित होते. कोळपे गुरुजी आणि आमदार अनिल भाऊंच्या पाठपुराव्याने या कामाचा आज शुभारंभ झाला असे मत तानाजी पाटील यांनी मांडले. तसेच टेंभूचे पाणी आल्यामुळे आटपाडी तालुक्यातुन विविध भागात होणारे लोकांचे स्थलांतर कमी झाले आहे. आ. बाबर यांच्या प्रयत्नाने आटपाडी तालुक्यात रस्त्यांची, विकासकामे होत आहेत. गेली दहा वर्षे तालुक्याचा विकास खुंटला होता, माजी आमदार हिशोब मांडत होते. आम्ही विकास कामे करतो जिरवाजिरवीचं राजकारण आम्ही करत नाही असेही ते म्हणाले.
शिक्षक बँकेचे माजी चेअरमन जगन्नाथ कोळपे म्हणाले, आमदार अनिलभाऊ व तानाजी पाटील यांच्यामुळे मिटकी गावाच्या विकासासाठी निधीचा हातभार लागला असून प्रलंबित कामे पूर्ण होत आहेत, तसेच विकास कामे करणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्धार मिटकीकरांनी केला आहे. यावेळी वाघमोडे वस्ती- पडळकर वस्तीच्याकडे जाणाऱ्या रोडवरील ओढ्यावर पूल उभारावे, कोळेकर-वलेकर वस्ती, यमगर वस्ती शाळा ते कटरेवाडी रस्ते डांबरीकरण करावेत, अशी मागणी कोळपे गुरुजी  यांनी केली.
 याप्रसंगी बजरंग लेंगरे, पुजारवाडी पै.संतोष पुजारी, खरसुंडीचे उपसरपंच जितेंद्र पाटील, माजी उपसरपंच विजयकुमार भांगे, अर्जुन पुजारी, ग्रा.पं.सदस्य दिलीप जानकर, नितीन पुजारी, बाळेवाडीचे माजी उपसरपंच संजय कोळेकर, ग्रामसेवक युवराज माने, यांचेसह संजय यमगर, सादिक शिकलगार, प्रकाश यमगर, विकास पुजारी, संजय कोकरे, आदिंसह मिटकी पंचक्रोशितील ग्रामस्थ उपस्थित होते.

आटपाडी तालुक्यात टेंभूचे पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी तर मिळाले आहे, परंतु वीज टंचाईस सामोरे जावे लागत आहे. रात्री विजपुरवठा होत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा उच्च दाबाने वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.
आ. अनिल बाबर
खानापुर-आटपाडी

No comments:

Post a Comment

Advertise