पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात बालदिनानिमित्त विविध कार्यक्रम - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 16, 2018

पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात बालदिनानिमित्त विविध कार्यक्रम

पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात बालदिनानिमित्त विविध कार्यक्रम
माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली, दि. 15,: पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली येथे पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी प्र. सापळे उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुबोध उगाणे, बालरोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतिश अष्टेकर, सहाय्यक प्राध्यापक डॉ. स्वाती खोत, प्रभारी अधिसेविका श्रीमती रश्मी कारंजकर, निवासी डॉक्टर्स, परिचर्या संवर्ग, कर्मचारी व लहान मुले आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर लहान मुलांच्या गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये सहभागी मुलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसवाटप करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय उपचारासाठी दाखल असलेल्या सर्व लहान मुलांना खाऊ व खेळणी वाटप करण्यात आले. सर्वच लहान मुलांनी कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागामध्येही लहान मुलांना खाऊ, खेळणी, शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. बालदिनाचे औचित्य साधून बालरुग्ण कक्ष व बाह्यरुग्ण विभागाचे सुशोभिकरण करण्यात आले. 

No comments:

Post a Comment

Advertise