अन्नधान्य दिनानिमित्त कृषि विभागाकडून आज आहार व्यवस्थापन विषयावर व्याख्यान - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 16, 2018

अन्नधान्य दिनानिमित्त कृषि विभागाकडून आज आहार व्यवस्थापन विषयावर व्याख्यान


अन्नधान्य दिनानिमित्त कृषि विभागाकडून आज आहार व्यवस्थापन विषयावर व्याख्यान 
राज्यमंत्री सदाभाऊ खोत व खासदार संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली, दि. 15 : महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाकडून शुक्रवार, दिनांक 16 नोव्हेंबर 2018 रोजी दुपारी 1.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये राष्ट्रीय पौष्टीक अन्नधान्य दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त डॉ. संदीप सातपुते यांचे आहार व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी केले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कृषि, फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील आणि कृषि विभागाचे माजी अतिरीक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांची उपस्थिती असणार आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise