संभाजीशेठ पाटील यांची कमान लक्षवेधी; आटपाडीच्या उतरेश्वर यात्रेनिमित्त लागल्या स्वागतकमानी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 27, 2018

संभाजीशेठ पाटील यांची कमान लक्षवेधी; आटपाडीच्या उतरेश्वर यात्रेनिमित्त लागल्या स्वागतकमानी

आटपाडीच्या उतरेश्वर यात्रेनिमित्त 
लागल्या स्वागतकमानी
संभाजीशेठ पाटील यांची कमान लक्षवेधी
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/वार्ताहर:  आटपाडीच्या उत्तरेश्वर यात्रेनिमित्त संभाजीशेठ पाटील यांनी यात्रेस येणाऱ्या भाविक भक्तांना यात्रेच्या शुभेच्छा देणारी आकर्षक कमान सर्व यात्रेकरूंचे व आटपाडी शहरवासियांचे लक्ष वेधून घेत आहे.  आटपाडी येथील उत्तरेश्वर यात्रा दि. २५/११/१८  ते ३०/११/१८ रोजी होत असून या यात्रेस येणाऱ्या भाविक भक्तांना गलाई व्यवसायिक व  युवा नेते संभाजीशेठ पाटील यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.


नेहमीच अनेक सामाजिक उपक्रम राबवून ते विकासासाठी प्रयत्नशील असतात. सामाजिक बांधिलकी जपत आटपाडीच्या विकासाचा आलेख नेहमीच चढता असावा हीच तळमळ त्यांची कायम असते.
विविध कार्यक्रमातून बक्षिसांचा वर्षाव नेहमीच करतात. डान्स स्पर्धा व क्रिकेट स्पर्धा असो किंवा एखाद्या देणगी असो ते नेहमी अग्रेसर असतात.
परप्रांतात जाऊन गलाई व्यवसाय करत असताना आटपाडीच्या मातीची त्यांची नाळ नेहमी जोडलेले असते. नेहमी ते आटपाडीच्या समाज सेवा कार्यात उत्फुर्त प्रतिसाद देत असतात.
यातूनच त्यांनी आटपाडीच्या कार्तिक उत्तरेश्वर देवस्थान यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा देणारी कमान उभी केली आहे. त्यामुळे आटपाडीच्या यात्रेला ग्लामर रूप आले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise