आटपाडी महार सामुदायिक शेतीच्या मागण्यासाठी चंद्रकातदादा पाटील यांना निवेदन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 2, 2018

आटपाडी महार सामुदायिक शेतीच्या मागण्यासाठी चंद्रकातदादा पाटील यांना निवेदन

आटपाडी महार सामुदायिक शेतीच्या मागण्यासाठी चंद्रकातदादा पाटील यांना निवेदन
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/वार्ताहर: आटपाडी येथे असणाऱ्या आटपाडी महार वतनी सामुदायिक शेती संस्थेच्या संदर्भात संस्थेच्या असणाऱ्या सभासदांची नोंद ही महसूल ७/१२ सदरी करावी या प्रमुख मागणीचे निवेदन राज्याचे महसूल व मदत पुनर्वसन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना संस्थेच्या वतीने संस्थेचे मुख्य प्रवतर्क विलास खरात यांनी दिले. यावेळी यशवंत मोटे, गौतम खरात, रावसाहेब खरात, कुमार मोटे, सुनिल मोटे, विजय खरात उपस्थित होते.


आटपाडी येथील डूबई कुरण या ठिकाणी आटपाडी महार वतनी सामुदायिक स्थापना करून सदर ठिकाणी संस्थेची शेतजमीन आहे. याठिकाणी असणाऱ्या शेतीवर आधारित संस्थेचे सभासद सदरची शेती करीत आहेत. परंतु सदरील सभासदांना शासनाच्या कोणत्याही शासकीय योजनाचा लाभ होत नाही. तसेच वैयक्तिक लाभ ही घेता येत नाहीत त्यामुळे सदरील असणाऱ्या शेतजमिनीवरील ७/१२ सदरी सभासदांची नावे लागावी यासाठी संस्थेचे मुख्य प्रवर्तक विलास खरात यांनी महसूलमंत्री चंद्रकातदादा पाटील यांची मंत्रालय येथे भेट घेऊन त्यांना सभासदांच्या असणाऱ्या अडी-अडचणी समजावून सांगितल्या असल्याने सभासदामधून समाधान व्यक्त येवू लागले आहे.

2 comments:

  1. दैनिक माणदेशी एक्सप्रेस एक निर्भीड निष्पेक वर्तमानपत्र आह,मा संपादक साहेब अभिनंदन

    ReplyDelete
  2. आपले दैनिक माणदेशी एक्सप्रेस ची प्रगती उत्तरोत्तर अशीच होत राहवो राहुल (सुनील)खरात पुणे

    ReplyDelete

Advertise