विद्युत वाहक तार पडून कोल्हा जागीच ठार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 13, 2018

विद्युत वाहक तार पडून कोल्हा जागीच ठारविद्युत वाहक तार पडून कोल्हा जागीच ठार 

माणदेश एक्सप्रेस न्युज 
गोंदवले/वार्ताहर- दि 12: वावरहिरे दानवलेवाडी रस्त्यावर आज एक विद्युत वाहक तार अचानक तुटून रस्त्यावर पडली यात वाळलेले गवत जळाले, तर एक कोल्हा जागीच मृत झाला, मात्र ग्रामस्थांनी वेळेवर लक्ष दिल्याने मोठा अनर्थ टळला.
वावरहिरे ता. माण येथून दानवलेवाडी गावाकडे जाणारा रस्ता असून आज पहाटे दानवलेवाडीला होणाऱ्या विद्युत पुरवठ्याची तयार अचानक तुटून रस्त्यावर पडली. या ठिकाणी जाधववाडा आणि पांढरे वस्ती अशा दोन वस्त्याकडे हा रस्ता जातो. पहाटे तार तुटल्यावर त्यातून विद्युत पुरवठा सुरूच होता व ठिणग्या पडल्याने त्या ठिकाणी असलेले गवत जळाले. यावेळी तिथून जाणारा एका कोल्हाचा त्या तारेला स्पर्श झाल्याने तो कोल्हा ही जागीच मयत झाला. ही गोष्ट त्या गावातील युवक बिठू पांढरे यांनी पाहिली. त्यांच्यामुळे ही बाब सगळीकडे समजल्याने पुढील अनर्थ टळला. अन्यथा या वस्तीवरील लोक दूध घालण्यासाठी किंवा अन्य कामासाठी याठिकाणावरून जातात, केवळ पांढरे यांच्या जागरूकपणामुळे दुर्घटना घडली नाही. 
सदर घटनेबाबत दहिवडी चे सहाय्यक विद्युत उपअभियंता प्रशांत वाघ यांना कळवताच त्यांनी तात्काळ कर्मचारी पाठवून काम तात्काळ केले. 

No comments:

Post a Comment

Advertise