माणदेशी चॅम्पियनच्या खेळाडूंचे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 16, 2018

माणदेशी चॅम्पियनच्या खेळाडूंचे


माणदेशी चॅम्पियनच्या खेळाडूंचे 
राष्ट्रयस्तरीय क्रिडा रांची येथील स्पर्धेत घवघवीत यश
माणदेश एक्सप्रेस न्युज 
म्हसवड/अहमद मुल्ला : येथील माणदेशी चॅम्पियनची खेळाडू वैष्णवी सावंत हिने रांची (झारखंड) येथील ३४ व्या राष्ट्रीय ज्युनिअर अथलेटिक्स  स्पर्धेत  दोन हजार मीटर स्टिपलचेस मध्ये देशामध्ये तिसरा क्रमांक पटकावुन ब्राँझ पदक मिळविले. 
सातारा जिल्ह्यामध्ये एकमेव वैयक्तिक पदक मिळविण्याचा मान मिळविला.
यापुर्वीही नागपूर येथे झालेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या स्टिपलचेस या क्रिडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला होता.
कु.सावंत हिने हे अंतर ७.४० मिनिटे इतक्या कालावधीत पूर्ण केल्याने तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. माणदेशी चॅम्पियन्सची कु.वैष्णवी सावंत  हिच्या यशाबद्दल म्हसवड येथील माणदेशी फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा, माणदेशी चॅम्पियन्स चे अध्यक्ष प्रभात सिन्हा, माणदेशी चँम्पियन्सचे सहायक ओंकार गोंजारी, समन्वयक मंगेश काटकर यांनी अभिनंदन केले. त्यांना प्रशिक्षक महालिंग खांडेकर, मारूती लोखंडे, बानूबाई बनगर, अरविंद चव्हाण, बजरंग थोरावत, तसेच पालक विलासराव सावंत व अमित बुगड आदींचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

Advertise