खास. मोहिते पाटील गटाची हॅट्रिक; शहाजीराव देशमुख, सुधाकर पोळ, सुरेश मोहीते नातेपुते उत्पादक गटातून विजयी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 27, 2018

खास. मोहिते पाटील गटाची हॅट्रिक; शहाजीराव देशमुख, सुधाकर पोळ, सुरेश मोहीते नातेपुते उत्पादक गटातून विजयी


खास. मोहिते पाटील गटाची हॅट्रिक
माळशिरस, इस्लामपूर, नातेपुते गटाचे सर्व उमेदवार विजयी 
शहाजीराव देशमुख, सुधाकर पोळ, सुरेश मोहीते विजयी 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे: श्री. शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर या साखर कारखान्याची मतमोजणी सुरू असुन खा. विजयसिंह मोहीते पाटील गटाने नातेपुते उत्पादक गटामधून अनुक्रमे शहाजीराव देशमुख, सुधाकर पोळ, सुरेश मोहीते यांनी विजयी झेंडा झळकावत माळशिरस, इस्लामपूर, नातेपुते अशी  खास. विजयसिंह मोहिते पाटील गटाची हॅट्रिक केली. 
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार खासदार गटाचे ९ उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये शहाजीराव देशमुख ४२३५, सुधाकर पोळ ४१२२, सुरेश मोहीते ३८६२ यांनी उच्चांकी मते घेत विजय संपादन केला. तर विरोधी पद्मजादेवी मोहिते पाटील गटाच्या गटाच्या सोपानराव माने १०६२, आजिनाथ राऊत १०००, शिवाजी सुळ १००९ एवढी मते मिळाली. या गटातील १३८ मते अवैध्य ठरली.
माळशिरस गट क्र. १ व इस्लामपूर व आता नातेपुते उत्पादक गटातून पॅनेल टू पॅनेल मतदान झाल्याने एकूण ९ उमेदवार निवडून आल्याने खा. विजयसिंह मोहिते-पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यात सुरुवात केली आहे. आजन्म हरण्याचा कुठे सवाल होता. जन्मताच माथी माझ्या गुलाल  होता. अशा आशयाच्या पोस्ट माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा फोटो असलेल्या  पोस्ट सर्व जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत आहेत. 
निवडणुकीच्या अधिक माहितीसाठी आमच्या www.mandeshexpress.com या वेबसाईट ला भेट द्या.


No comments:

Post a Comment

Advertise