आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा: दिलीप मोटे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 6, 2018

आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा: दिलीप मोटे


आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा: दिलीप मोटे 
न्यू माणदेश युथ फाउंडेशन चा उपक्रम, भूमीपुत्रांचा सहभाग
माणदेश एक्सप्रेस न्युज 
निंबवडे/वार्ताहर : दि 7 नोव्हें. बुधवार रोजी निंबवडे येथे होणाऱ्या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन न्यू माणदेश युथ फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष दिलीप मोटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले.  यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष नानासाहेब झुरे, खजिनदार जयंत देठे, सूर्यकांत मेटकरी, जेष्ठ सदस्य व मार्गदर्शक अशोक मोटे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी बोलताना संघटनेचे प्रवक्ते विवेकानंद पिसे यांनी सांगितले की, सलग ४ थ्या  वर्षी या शिबिराचे आयोजन करण्यात येत असून गावकाऱ्यांसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने गावातील तरुण लोकांना एकत्र बांधून त्यांचा न्यू माणदेश युथ फाउंडेशन चा फोरम तयार करण्यात आला आहे.  एक दिवस गावच्या लोकांसाठी काम करण्याची संकल्पना पुढे आली आणि तरुणांनी आणि गावच्या असणाऱ्या डॉक्टरांचे याकामी मोलाचे सहकार्य केले आहे.
योगेश मगदूम यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना या शिबिरात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून त्यात दंत विभाग, नेत्र विभाग, स्त्री रोग विभाग, जनरल सर्जन, रक्त साखर, हाडाचे विकार अशा विविध आजारांवर या शिबिरात उपचार केले जातील. यासाठी गावातील आणि पंचक्रोशीतील डॉक्टर उपस्थित राहणार आहे.
यावेळी रक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले आहे. न्यू माणदेश युथ फाउंडेशन या भूमिपुत्रांचा सामाजिक संघटनेचा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी डॉ. सूर्यकांत मेटकरी, हणमंत वाघमोडे, संदीप पिंजारी, प्रताप मोटे  तसेच महिला विभागाच्या सौ.संगीता मेटकरी, सौ. सुमन पाटील आदींची उपस्थिती होती.


भूमिकन्या श्रुतिका मोटे करणार उदघाटन.
निंबवडे गावचे सुपुत्र आणि आटपाडी तालुक्यातील पहिली पी.एच.डी. असलेले डॉ. लक्ष्मण मोटे यांची कन्या असलेली श्रुतिका मोटे-लवटे या कार्यक्रमाचे उदघाटन करणार असून त्या सध्या पंचायत समिती सांगोलाच्या सभापती आहेत. यावेळी तातोबा कोळेकर (सह सचिव आरोग्य विभाग,मंत्रालय,मुंबई ) यांच्या वतीने पुस्तक वाटप कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते घेण्यात येईल. या कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी सौ पवार आणि लोकनियुक्त सरपंच निंबवडे नंदाताई देठे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

No comments:

Post a Comment

Advertise