शिवराम मासाळ याला अटक - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 13, 2018

शिवराम मासाळ याला अटक

शिवराम मासाळ याला अटक
माणदेश न्यूज नेटवर्क
आटपाडी/वार्ताहर: बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष, जांभुळणी गावचे युवा नेते, शिवराम मासाळ १३८ प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांना सांगली येथील कारागृहांमध्ये हलविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की शिवराम मासाळ यांनी आटपाडी येथील पी.एन. कदमसाहेब यांच्याकडून हातउसणे म्हणून रक्कम घेतली होती. त्या रकमेच्या मोबदल्यात यांनी त्यांना बँक ऑफ इंडिया शाखा खरसुंडी या शाखेचे धनादेश दिले होते व सदरील बँकेच्या खात्यामध्ये पैसे आहेत असे सांगून सदरील चेक वटण्यास सांगितले होते. परंतु त्यांच्या खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याने सदरील धनादेश न वाटताच महागारी आल्याने कदम यांनी न्यायालयात सदर प्रकरणी दाद मागितली होती. न्यायालयाने त्यांना हजर राहण्यास समन्स बजावूनही न्यायालयात उपस्थित राहात नसल्याने न्यायालयाने त्यांना अटक वॉरंट काढले होते. सदरील प्रकरणी पोलिसांनी बऱ्याच वेळा त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते मिळून येत नव्हते. दि. ११ रोजी जवळे मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी एका विवाहप्रसंगी आला असता पोलिसांनी शिवराम मासाळ  याला अटक केली. शिवराम मासाळ हा जांभूळणी गावच्या सरपंच संगिता मासाळ यांचे पती आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise