Type Here to Get Search Results !

"शंकर" मध्ये विजयदादांचे "रणजित" ; २१ जागेवरती खासदार विजयसिंह मोहिते पाटील गटाचे तर डॉ.धवलसिंह मोहिते पाटील व भानुदास सालगुडे-पाटील गटाच्या सर्वच उमेदवारांचा पराभव.


"शंकर" मध्ये विजयदादांचे "रणजित" 
२१ जागेवरती खासदार विजयसिंह मोहिते पाटील गटाचे तर डॉ.धवलसिंह मोहिते पाटील व भानुदास सालगुडे-पाटील गटाच्या सर्वच उमेदवारांचा पराभव.
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे: सदाशिवनगर येथील श्री .शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये २१ जागेवरती खासदार विजयसिंह मोहिते पाटील गटाचे सर्वच उमेदवार मोठ्या मतधिक्याने विजयी झाले आहेत. तर डॉ.धवलसिंह मोहिते पाटील व भानुदास सालगुडे-पाटील गटाच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाला आहे. या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागेसाठी ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. अनुसूचित जाती-जमाती गटामधील तिरंगी लढत वगळता सर्व ठिकाणी दुरंगी लढती झाल्या. झालेल्या निवडणुकी मध्ये खासदार विजयसिंह मोहिते पाटील गटाच्या सर्व सदस्यांना  सभासदांनी मोठ्या मतधिक्याने निवडून दिले आहे. तालुक्यात पहिल्यांदाच मोहिते पाटील विरोधी मोहिते पाटील अशी निवडणूक रंगली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वाचेच लक्ष लागून होते. मात्र झालेल्या निवडणूक निकालामध्ये  रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतुत्वाला सभासदांनी पसंती दिली.
माळशिरस येथील महसूल भवन मध्ये निवडणुकीची मतमोजणी करण्यात आली. सकाळी आठ  वाजण्याच्या सुमारास सुरु झालेली मोतमोजणीचे निकाल रात्री आठ वाजता संपली. मतमोजणी साठी केंद्रनिहाय ३५ टेबल ठेवण्यात आले. त्यामुळे एकाच वेळी सर्व मतदार केंद्राची एकाचवेळी मतमोजणी झाल्याने लवकर संपली. मतमोजणी दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दिवसभर निकाल जाहीर करण्यात आल्यामुळे गटा गटाच्या नागरिकांनी गुलालाची मुक्त उधळण व हलगीच्या निनांदात आनंदोत्सव साजरा केला.

निवडणुकीमध्ये उमेदवारांना मिळालेली मते खालील प्रमाणे  

संस्था प्रतिनिधी गट-रणजितसिंह मोहिते पाटील २७,पद्मजादेवी मोहिते पाटील ८

अनुसूचित जाती- जमाती प्रतिनिधी गट– लक्ष्मण मिसाळ ४१९४ विरूद्ध अर्जुन धाईजे ७६ विरूद्ध लक्ष्मण ढोबळे १०३९ (तिरंगी लढत)

महिला राखीव गट- मीनाक्षी सावंत ४००५ व देवयानी सालगुडे- पाटील ४१०० विरूद्ध पद्मजादेवी मोहिते- पाटील ११८१ व धनश्री मोहिते- पाटील ११८४

इतर मागासवर्गीय जाती प्रतिनिधी गट- शिवाजी गोरे ४२४८  विरूद्ध जनार्धन शिंदे १०९१

भटक्या विमुक्त जाती व जमाती गट प्रतिनिधी– सुनील माने ४२०८ विरूद्ध लक्ष्मण मारकड ११४८

गटनिहाय उमेदवार खालील प्रमाणे 

माळशिरस गट – मिलिंद कुलकर्णी ४१९३, सुरेश पाटील ३९०१, धोंडीराम नाळे ४०६५, पोपट निंबाळकर १०४६, संभाजी बोकफोडे १००४, भानुदास सालगुडे १०६४

इस्लामपूर गट- रामदास कर्णे ४०९१, दत्तात्रय रणनवरे ४०६१, अमित माने ४१०४, बबुताई पवार ११२४, उत्तम बाबर १०६५, शहाजी कदम १०८७

नातेपुते गट- सुधाकर पोळ ४१२२ ,सुरेश मोहिते ३८६२, शहाजीराव देशमुख ४२३५, सोपानराव माने१०६२, अजिनाथ राऊत १०००, शिवाजी सूळ १००९

फोंडशिरस गट– चंद्रकांत शिंदे ४०२४, दत्तू वाघमोडे ३९४०, संजय कोरटकर ४१५३, संजय दाभाडे १०४६, सुनील माने १०३४, मधुकर वाघमोडे १०४९

बोरगाव गट- दत्तात्रय चव्हाण ४१२८, बलभीम पाटील ४०९२, भगवान मिसाळ ३९८१ धवलसिंह मोहिते पाटील ११९४, पांडुरंग शेटे १०१९, सुदर्शन मिसाळ १०९३,

या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमंत पाटोळे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार अभिजित पाटील काम यांनी काम पाहिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies