शुक्राचार्य येथील कामाला आमदार बाबर यांच्या प्रयत्नाने गती - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, November 19, 2018

शुक्राचार्य येथील कामाला आमदार बाबर यांच्या प्रयत्नाने गती


शुक्राचार्य येथील कामाला आमदार बाबर यांच्या प्रयत्नाने गती
माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/वार्ताहर: खानापूर चे आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून श्री क्षेत्र शुकाचारी देवस्थान येथे  संरक्षक भिंत बांधण्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी दिलेला होता ,ते काम पूर्ण झाले आहे.
शुकाचार्य हे भिवघाट नजीक  असणारे  पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. या देवस्थान ची यात्रा श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी मोठ्या प्रमाणात भरते.  अनेक ठिकाणाहून या यात्रेला लोकांची गर्दी होते. तसेच प्रेक्षणीय स्थळ म्हणून या भागाचा नावलिक नावलौकिक सर्वत्र आहे.  परंतु हे देवस्थान पूर्णपणे डोंगराळ भागात असल्यामुळे भाविकांना मंदिराजवळ जाण्यासाठी रस्त्यावरील एका बाजूने मोठे मोठे दगड होते ते खूप धोकादायक होते. तसेच माती ढासळत होती. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत होता. पायी चालत जात असताना चांगला रस्ता व खात्रीशीर सुरक्षा याठिकाणी गरजेची होती. खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून एका बाजूला संरक्षण भिंत व एका बाजूला ग्रील घातल्यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

Advertise