"माणदेशी शेतकरी उत्पादक कंपनी" स्थापन करणार : प्रभातदादा सिन्हा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 2, 2018

"माणदेशी शेतकरी उत्पादक कंपनी" स्थापन करणार : प्रभातदादा सिन्हा

"माणदेशी शेतकरी उत्पादक कंपनी" स्थापन करणार : प्रभातदादा सिन्हा
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : माणदेशी शेतकऱ्यांच्या शेती मालास योग्य बाजारभाव मिळवुन देण्यासाठी माणदेशी फौउंडेशन "माणदेशी शेतकरी उत्पादक कंपनी" स्थापन करणार असुन भविष्यात या कंपनीच्या माध्यमातून शेतकरी यांचा आर्थिक विकास साधण्याचा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती माणदेशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभातदादा सिन्हा यांनी दिली.

मुंबई येथील फेसबुक प्रस्तुत वन इंडिया या कार्यक्रमात कौशल्य विकास आणि उद्योजकतेमधील भारताचे भविष्य या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री.सिन्हा बोलत होते. ते पुढे म्हणाले की, माणदेशी फौंडेशन व बँकेच्या माध्यमातून विशेषत: ग्रामीण भागातील महिला व लोकांना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य विकासाचे व उद्योजकतेचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण पुर्ण होताच त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी माणदेशी बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यामुळे आज हजारोंच्या संख्येने महिला सक्षम झाल्या आहेत. तसेच महिलांना बचतीचे महत्व पटवून देऊन त्यांची बँकेत खाती काढून देण्यात आली. त्यामुळे आज त्या महिला भविष्यातील तरतुदीसाठी अर्थिक बचत करू लागल्या आहेत. शेतकरी समृद्ध होण्याकरिता जी माणदेशी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणार आहे त्या माध्यमातून गटशेतीला चालना मिळणार आहे. तसेच कृषीमाल प्रक्रिया उद्योग उभारले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार आहे. जवळपास एक हजार शेतकरी या कंपनीत समाविष्ट केले जाणार असल्याने नवीन शेती तंत्रज्ञान, अद्ययावत शेती मशिनरींची माहिती, शेती अवजारे, शेतीऔषधे योग्य भावात शेतकरी यांना उपलब्ध होतील. या सर्वामुळे शेतकरी सक्षम होण्यास निश्चितच मदत होईल,

या कार्यक्रमास  एम.पानीच्या, आकांक्षा हजारी, कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,  इंटेलीकॅपचे विकास बाली, एन.एम.आय.एम.एस. च्या डॉ. मीना गलियारा इत्यादी मान्यवर या चर्चासत्रात सहभागी होते.

No comments:

Post a Comment

Advertise