निंबवड्यात आरोग्य सेवेने दिपावली, तरुणांचा उस्फुर्त सहभाग, रक्तदान शिबिर संपन्न - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, November 7, 2018

निंबवड्यात आरोग्य सेवेने दिपावली, तरुणांचा उस्फुर्त सहभाग, रक्तदान शिबिर संपन्न


निंबवड्यात आरोग्य सेवेने दिपावली 
 तरुणांचा उस्फुर्त सहभाग, रक्तदान शिबिर संपन्न 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
निंबवडे/वार्ताहर : माणदेशातील मातीचा  नाविन्यपूर्ण जगण्याचा गुण घेऊन या कातळावर अनेक गाव अन माणस उभा आहेत त्यातलं निंबवडे एक गाव. आपल्या नवनवीन उपक्रमासाठी माणदेशात ओळखलं जातं. चार वर्षांपुर्वी तरुणांना एकत्र बांधून ही क्रियशक्ती गावच्या उपयोगाला आणण्यासाठी काही तरुणांनी न्यू माणदेश युथ फाउंडेशन ची स्थापना केली. 
या फाउंडेशन मार्फत काल दि. ७ रोजी निंबवडे गावात मोफत आरोग्य शिबीर राबवण्यात आले. या शिबिराचे उदघाटन या गावच्या सुकन्या सांगोला पंचायत समितीच्या सभापदी सौ. श्रुतिका मोटे-लवटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी सौ. पवार ह्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. निंबवडे पंचायत समिती गणाच्या सदस्या  सौ. पुष्पाताई सरगर आणि गावच्या लोकनियुक्त सरपंच श्रीम नंदाताई देठे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी या गावच्या व परिसरातील डॉक्टर्स सुपुत्रांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातुन एक दिवस गावासाठी, गावच्या मातीसाठी काढून ही सेवा केली. यावेळी दंत विभागात डॉ. सूर्यकांत मेटकरी, डॉ. पृथ्वीराज पाटील, डॉ. प्रियांका देवडकर यांनी सेवा बजावली. तर स्त्रीरोग विभाग डॉ. हेमा देठे यांनी पाहिला. जनरल विभाग डॉ. सप्तेश  जाधव आणि डॉ. अमित पिंजारी यांनी तपासणी केली नेत्र विभागात डॉ. बुधावले, डॉ. संजय पिंजारी यांनी काम पाहिले. 

या उपक्रमात सिध्दनाथ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल च्या डॉ. बाबासो रुपनर यांच्या सोबत त्यांच्या टीम ने विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमात न्यू माणदेश युथ फाउंडेशन च्या स्वयंसेवक टीम च्या विवेकानंद पिसे, तात्यासाहेब कुंभार, डॉ. निलेश जाधव, आकाश देवडकर, अतिष कोळेकर, मंगेश जाधव, संदीप पिंजारी, राघव मेटकरी, योगेश मगदूम, काका परीट, नानासाहेब झुरे, जयंत देठे, दिलीप मोटे, सुनील होळे, जितेंद्र कुलकर्णी, डॉ राहुल पिंजारी यांनी विशेष परिश्रम घेतले. 

 स्टेजवर प्रथमच सर्व महिला पदाधिकारी
 या कार्यक्रमाच्या उदघाटन डॉ. सौ. श्रुतिका मोटे-लवटे यांच्या शते करण्यात आले. टर  प्रमुख पाहुणे डॉ. सौ. पवार, प्रमुख उपस्थिती सौ. पुष्पाताई सरगर, लोकनियुक्त सरपंच नंदाताई देठे, महिला विंग च्या सौ. संगीता मेटकरी, सौ. सुमन पाटील यांच्यासोबत डॉ. प्रियांका व डॉ. हेमा देठे या स्टेज वर एकत्र आल्याने संपूर्ण स्टेज वर सर्व महिला असल्याचे दुर्मिळ आणि वेगळे चित्र यावेळी पाहायला मिळाले या निमित्ताने गावच्या लेकी सुनांचा सन्मान जाणीवपूर्वक झाला.

   हा तरुणांच्या विचारांचा फोरम
   न्यू माणदेश युथ फाउंडेशन हा नवीन विचारांच्या तरुणाई चा फोरम असून यातून नवीन संकल्पना ज्या समाजाच्या कामाला येतील याबाबत भविष्यात आखणी करू.
नानासाहेब झुरे

No comments:

Post a Comment

Advertise