निंबवडेत विभागीय कृषी सहसंचालकांची भेट - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 6, 2018

निंबवडेत विभागीय कृषी सहसंचालकांची भेट


निंबवडेत विभागीय कृषी सहसंचालकांची भेट
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/वार्ताहर: कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक तांबाळे यांनी निंबवडे येथील सेंद्रिय शेती बचत गट कृषी आनंद येथे भेट देऊन पाहणी केली. कृषी विभागाने इ जी एस योजनेतून चिक्कू, बोर लागवडीस अनुदान दिलेले होते, त्या बागेत भेट देऊन त्याची पाहणी केली, सेंद्रिय केळी डाळिंब, पपई, शेवगा, झेंडू या क्षेत्रात प्रत्यक्ष भेट दिली, त्याच्या विक्री व्यवस्थेविषयी उत्पादन वाढवणे विषयी मार्गदर्शन केले. दशपर्णी अर्क, सेंद्रिय मल्चिंग, पाणी व्यवस्थापनाचे त्यांनी पाहणी केली. यावेळी गटाचे अध्यक्ष जाधव यांनी आभार मानले.
निंबवडे येथील बाळकृष्ण तुकाराम पिंजारी यांनी रीसो-रिस कंपनीचा ठिबक संच ऊस पिकासाठी बसवलेला होता त्याची ही त्यांनी तपासणी केली. उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान अंतर्गत रब्बी ज्वारी प्रात्यक्षिक प्लॉटला भेट दिली. यावेळी पीक पद्धतीतील बदल, विक्री व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, शेततळे व आत्मा अंतर्गत योजनांचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर, मंडल कृषी अधिकारी लोखंडे, कृषी पर्यवेक्षक डी.सी. मोरे, कृषी सहाय्यक शिवाजी सूर्यवंशी, चौधरी, नंदकुमार देशमुख, शेतकरी डॉ. बाळकृष्ण पिंजारी, धर्मेंद्र जाधव, सुदाम जाधव, शरद पाटील, संभाजी पाटील, गणेश पिंजारी, दशरथ पिंजारी आदी शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise