वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार शुक्रवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, November 14, 2018

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार शुक्रवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर


वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार शुक्रवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर
माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली, दि. 13 : राज्याचे वित्त आणि नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार शुक्रवार, दिनांक 16 नोव्हेंबर 2018 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 
शुक्रवार, दिनांक 16 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 9.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने सांगलीकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वाजता दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या भव्य स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ - महात्मा गांधी वसतीगृह आवार, सांगली मिरज रस्ता, हॉटेल सदानंदजवळ, सांगली. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत श्रीमती निता केळकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्षा यांच्या निवासस्थानी राखीव, स्थळ - विनायक बंगला चिंतामणनगर, सांगली. दुपारी 2.30 वाजता जीएसटी भवन सांगलीच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ - जीएसटी भवन सांगली. सायंकाळी 4 वाजता भाजपा कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती, स्थळ - वारणा मंगल कार्यालय मार्केटयार्ड, सांगली. सायंकाळी 5.30 वाजता मोटारीने सांगलीहून बेळगावकडे (कर्नाटक) प्रयाण.

No comments:

Post a Comment

Advertise