विष्णू जायभाय यांचा बदली निमित्त सत्कार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 2, 2018

विष्णू जायभाय यांचा बदली निमित्त सत्कार

विष्णू जायभाय यांचा बदली निमित्त सत्कार
माणदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी/वार्ताहर: जिल्हा परिषद शाळा वलवण ता.आटपाडी येथे आंतरजिल्हा बदली झालेल्या विष्णू पंढरीनाथ जायभाय (उपशिक्षक) यांचा निरोप समारंभ सर्व शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत वलवण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. जायभाय सरांचा सर्व शिक्षक, ग्रामस्थ तसेच सर्व मित्र परिवार यांच्या हस्ते फुल पोषाख, चांदीची गणेश मुर्ती भेट देवून सहपरिवार सत्कार करण्यात आला.


यावेळी जेष्ठ मुख्याध्यापिका सुनंदा गुरव, सचिन खरमाटे, रसिक सपाटे, किरण सोहनी, गेजगे, पवार, हसबे, कांबळे, आर.आर.सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन जाधव, उपाध्यक्ष  रामभाऊ जाधव, वलवण गावचे विद्यमान सरपंच दगडू गेजगे, उपसरपंच मारुती जाधव, कारखान्याचे डायरेक्टर विलासभाऊ गुरव, सदाकाका पाटील, अर्जून पाटील, राहूल जाधव, माजी सरपंच प्रदिप पाटील, माजी सरपंच  विकास शिंदे, प्रशांत पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य हे प्रमुख उपस्थिती होते.
याप्रसंगी शिक्षक बकेचे माजी चेअरमन जगन्नाथ कोळपे, खरसुंडीचे माजी केंद्रप्रमुख शशिकांत माने, पलुस तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष नितिनराव चव्हाण, आटपाडी तालुका अध्यक्ष आसिफ मुजावर, विश्वास पुजारी, भास्कर खाडे यांनी मनोगत व्यक्त करताना जायभाय सरांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी शाळेचे माजी शिक्षक, माजी केंद्रीय प्रमुख माने सर, खरसुंडी, घरनिकी, तसेच नेलकरंजी केंद्रातील सर्व शिक्षक, आटपाडी तालुक्यातील सहकारी शिक्षक, वलवण येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन फुंदे व काळे यांनी केले प्रास्ताविक धनाजी देठे तर आभार भिमराव सावंत सर यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Advertise