Type Here to Get Search Results !

विद्यार्थी दिनानिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विद्यार्थांना वही, पेन व बिस्किट वाटप


विद्यार्थी दिनानिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने
 विद्यार्थांना वही, पेन व बिस्किट वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/प्रतिनिधी : राष्ट्रीय अध्यक्ष आम.प्रा.जोगेंद्र कवाडे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिप कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने व राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज येथील सारनाथ बुद्ध विहार येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांचे हस्ते विद्यार्थांना वही पेन व बिस्किट वाटप करण्यात आले.
भारतीय घटनेचे निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 7 नोव्हेंबर 1900 रोजी सातारा येथील प्रतापसिंग हायस्कूलमधे शाळा प्रवेश झाला. या ऐतिहासिक क्षणाची अविस्मरणीय आठवण भावी पिढीला होऊन विद्यार्थांमधे शैक्षणिक क्रांतीची स्फूर्ती निर्माण व्हावी यासाठी 7 नोव्हेंबर हा दिवस प्रत्येक वर्षी शाळा दिन व महाविद्यालयांमधे विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. बाल भीमाची अर्थात भिमराव रामजी आंबेडकर यांची स्वाक्षरी असलेला अनमोल दस्तऐवज सातारा येथील प्रतापसिंग हायस्कूलने आजही जतन करून ठेवला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनाचे अर्थात विद्यार्थी दिवसाचे औचित्य साधुन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अकलूज येथील सारनाथ बुद्ध विहार येथे विद्यार्थांना वही पेन व बिस्किट वाटप जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन तालुका उपाध्यक्ष गुरु गायकवाड, विनोद सावंत यांनी केले.
यावेळी तालुका संपर्क प्रमुख बॉबी वाघमारे, तालुका कार्याध्यक्ष हेमंत कांबळे, शिवाजी खडतरे, प्रशांत सौदागर, शंभु जगताप, ओंकार लोखंडे, राहुल गवळी, समाधान गवळी ,गौरव रिसवडकर यांचेसह इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies